Manoj Kumar Funeral Amitabh Bachchan and Abhishek Bachchan, Salim Khan and Arbaaz Khan among several other Bollywood celebs arrive to pay final respects
Actor Manoj Kumar Funeral: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मनोज कुमार यांचं काल (०४ एप्रिल) निधन झालं, वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोज कुमार यांच्यावर शनिवारी (०५ एप्रिल) जुहूतल्या स्मशानभुमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेता-दिग्दर्शक मनोज कुमार यांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळून मुंबईतील जुहू येथील पवनहंस स्मशानभूमीत आणण्यात आले. येथे त्यांना मुंबई पोलिसांकडून २१ तोफांची सलामी देण्यात आली. त्यांचा मुलगा कुणाल गोस्वामी यांनी मनोज कुमार यांना मुखाग्नी दिला. अभिनेत्याच्या निधनाचे वृत्त ऐकून चाहत्यांसह सेलिब्रिटींवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
वादळवाट फेम ज्येष्ठ अभिनेते डॉ विलास उजवणे यांचं निधन, वयाच्या 62 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मनोज कुमार यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली होती. यावेळी प्रेम चोप्रा, सलीम खान, अमिताभ बच्चन, रझा मुराद, सुभाष घई, अभिषेक बच्चन, अनु मलिक अरबाज खान, राजपाल यादवसह अनेक सेलिब्रिटी यावेळी अंत्यसंस्काराला उपस्थित होते. मनोज कुमार यांचे पार्थिव पवनहंस स्मशानभूमीत विशेष सन्मानाने आणण्यात आले. मनोज कुमार यांच्यावर रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जुहू येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आपल्या लाडक्या अभिनेत्याला, मित्राला आणि परिवारातील महत्वाच्या सदस्याला शेवटचा निरोप देताना सर्वांचेच डोळे पाणावले होते. मनोज कुमार यांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळण्यात आले आणि त्यांना राज्य सन्मानासह २१ तोफांची सलामी देण्यात आली होती.
VIDEO | Maharashtra: Mortal remains of actor Manoj ‘Bharat’ Kumar were consigned to flames at Pawan Hans Crematorium in Mumbai. He was given state honours a while back.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/2dcT7npEnC
— Press Trust of India (@PTI_News) April 5, 2025
Rashmika Bday : संघर्ष आणि गरिबीत गेले रश्मिकाचे बालपण, अभिनयाच्या कारकिर्दीत होता कुटुंबाचा विरोध!
दरम्यान, मनोज कुमार यांच्या अंत्ययात्रेवेळी रुग्णवाहिका वेगवेगळ्या फुलांनी सजवण्यात आली होती. रुग्णवाहिकेवर अभिनेत्याचा जुना फोटो लावण्यात आला होता. मनोज कुमार यांचे पार्थिव कोकिलाबेन रुग्णालयातून त्यांच्या घरी आणण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना शेवटचा निरोप देताना मनोज कुमार यांची पत्नी शशी गोस्वामी अत्यंत भावुक झाल्या होत्या. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये मनोज कुमार यांची पत्नी मनोज कुमार यांना अंतिम निरोप देताना भावूक झाली होती. त्यांच्या चेहऱ्यावर पतीच्या निधनाचं दु:ख अगदी स्पष्ट रित्या पाहायला मिळत होते. मनोज कुमार यांची पत्नींना दोन्ही बाजूंनी दोघी महिलांनी पकडून त्यांना अंत्यदर्शन करण्यासाठी मदत केली. दरम्यान, मनोज कुमार यांना चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत.
#WATCH | Mumbai: Shashi Goswami, wife of Indian actor and film director Manoj Kumar, arrives at the cremation ground in Juhu to attend the last rites of her husband
Manoj Kumar passed away at the age of 87 yesterday. pic.twitter.com/YChEU1T4mH
— ANI (@ANI) April 5, 2025
‘…माझ्या मांडीवर शांतपणे जीव सोडला दादांनी’ किरण माने यांची वडिलांसाठी मन हेलावणारी पोस्ट
भारतीय चित्रपटसृष्टीत ‘भरत कुमार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनोज कुमार यांचे मूळ नाव हरिकिशन गिरी गोस्वामी आहे. दिल्लीमधून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन त्यांनी मुंबईत पाऊल ठेवले. मनोज कुमार यांनी दिलीप कुमार मुख्य भूमिकेत असलेल्या ‘शबनम’ चित्रपटात छोटीशी भूमिका साकारत अभिनयात पाऊल ठेवले. मनोज कुमार यांची चार दशकांची सिनेकारकीर्द आहे. १९५७ मध्ये रिलीज झालेल्या ‘फॅशन’चित्रपटातून मनोज यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. तिथपासून पुढची ३८ वर्षे म्हणजे जवळपास चार दशकं ते काम करत होते. १९९५ मध्ये आलेला ‘मैदान ए जंग’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यांची देशभक्तिपर गीतं आजही लोकप्रिय आहेत. आपल्या अभिनय आणि चित्रपटांमधून देशभक्तीची गोडी लावणारा असा कलाकार आज जरीही आपल्यात नसला तरीही तो आपल्या अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात घर करुन असेल, हे नक्की….