Dr Vilas Ujawane Pay To Tribute
प्रसिद्ध अभिनेते आणि वादळवाट फेम अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं निधन झालं आहे. ते ६१ वर्षांचे होते. टिव्ही अभिनेते डॉ. विलास उजवणे यांना ब्रेनस्ट्रोक झाला होता. शिवाय, हृदयासंबंधीत विकार झाल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. काल (०४ एप्रिल) त्यांची प्राणज्योत मालवली. विलास उजवणे यांनी मराठी मालिका, सिनेमा आणि हिंदी मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून त्यांच्या चाहत्यांसह नातेवाईकांवर, कुटुंबीयांवर आणि मित्र मंडळींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असं कुटुंब आहे.
दरम्यान, टिव्ही अभिनेते डॉ. विलास उजवणे यांच्या निधनावर अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. त्याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अभिनेत्याला आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. काही तासांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर अभिनेत्याचा फोटो पोस्ट करत श्रद्धांजली वाहिलीये. अभिनेता डॉ. विलास उजवणे यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री म्हणतात, “ज्येष्ठ अभिनेते डॉ.विलास उजवणे यांचं वयाच्या ६२ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. भारदस्त आवाज आणि सहज अभिनयाच्या जोरावर वादळवाट, दामिनी, चार दिवस सासूचे यांसारख्या मराठी मालिकांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या. मराठी सिनेमे आणि नाटकांमध्येही त्यांनी काम केले. पडद्यावर खलनायकी भूमिका साकारणारा हा कलाकार वैयक्तिक आयुष्यात मात्र दिलदार आणि सहृदयी व्यक्ती म्हणून ओळखला जात असे. काही वर्षापूर्वी ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या आजारातून बरे होऊन पुन्हा सक्रिय होतील असे वाटले होते. मात्र नियतीला ते मान्य नव्हते. त्यांच्या जाण्याने एक सिद्धहस्त कलाकार आपल्यातून दूर गेला आहे. माझ्याकडून तसेच संपूर्ण शिवसेना परिवाराकडून डॉ.विलास उजवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली…”
“ज्येष्ठ मराठी अभिनेते व रंगकर्मी डॉ. विलास उपाख्य नाना उजवणे यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आणि दुःखद आहे. नागपूरच्या रंग स्वानंद नाट्यसंस्थेतून त्यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली. अनेक मराठी नाटके, मालिका व चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे रसिकांच्या मनावर ठसा उमटवला. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम् शांती”, अशी पोस्ट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
ज्येष्ठ मराठी अभिनेते व रंगकर्मी डॉ. विलास उपाख्य नाना उजवणे यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आणि दुःखद आहे. नागपूरच्या रंग स्वानंद नाट्यसंस्थेतून त्यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली. अनेक मराठी नाटके, मालिका व चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे रसिकांच्या मनावर ठसा… pic.twitter.com/G88IbExMb8 — Chandrashekhar Bawankule (@cbawankule) April 4, 2025
वादळवाट फेम ज्येष्ठ अभिनेते डॉ विलास उजवणे यांचं निधन, वयाच्या 62 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते डॉ.विलास उजवणे यांचे निधन काही आजारामुळे झाले. त्यांची गेल्या काही वर्षांपासून अनेक आजारांसोबत झुंज सुरु होती. काही वर्षांपूर्वीच त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता, त्याचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला होता. सहा वर्षांपासून त्यांनी ब्रेन स्ट्रोकशी झुंज दिली, या आजाराचा सामना करता करता त्यांची संपूर्ण जमा पूंजी खर्च झाली होती. त्यातच त्यांना हृदयाचा त्रासही सुरु झाला होता. या सर्व त्रासाला विलास तोंड देत असतानाच दोन वर्षांपूर्वी त्यांना कावीळ झाली होती. या काळात त्यांना आर्थिक मदतीची गरज होती. त्यांचं तात्काळ ऑपरेशन करणं गरजेचं होतं, उपचारांसाठी विलास यांना आर्थिक मदतीची गरज असल्याचं समोर आलं होतं. इतकं होऊनही त्यांच्यात जगण्याची एक जिद्द होती. या आजारपणातून सावरत असतानाच, त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला अन् त्यांची प्राणज्योत मालवली.
Rashmika Bday : संघर्ष आणि गरिबीत गेले रश्मिकाचे बालपण, अभिनयाच्या कारकिर्दीत होता कुटुंबाचा विरोध!
भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या अभिनेता विलास उजवणे यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांनी आपल्या फिल्मी करियरमध्ये, अनेक मराठी नाटकं, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या सिनेकरियरमध्ये ‘वादळवाट’ही सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मालिकेंपैकी एक आहे. याशिवाय उजवणेंनी ‘चार दिवस सासूचे’ आणि ‘दामिनी’यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधील भूमिकांतून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.