asha bhosale
आशा भोसले यांना खरे तर इंजेक्शन देणाऱ्या परिचारिका बनायचे होते पण त्याऐवजी त्या गायिका झाल्या आणि एवढेच नव्हे तर त्यांच्या सर्वोत्कृष्ट खाण्याच्या सवयीमुळे त्यांनी जगभरातील अनेक ठिकाणी जागतिक दर्जाची रेस्टॉरंट सुरु केली. त्यांनी हे कसे केले हे त्यांच्याच तोंडून ऐकण्यासारखे असते. लतादीदींवर प्रचंड प्रेम करणाऱ्या आशाताई एकदा दीदींवर खूप रागावल्या होत्या जेव्हा दीदींनी स्टेजवर वॉकिंग स्टिक घेऊन नृत्य केले होते. आशा ताई आता ८९ वर्षांच्या झाल्या आहेत, यानिमित्ताने त्यांनी स्वतःचे YouTube चॅनेल तयार केले आहे. आशाताई आराम करण्यासाठी आणि तणावमुक्त होण्यासाठी डेट नाईट आणि डेस्टिनेशन ट्रिपला जातात. आणि यावेळी त्यांच्यासोबत असते त्यांची नात झनाई भोसले.
झनाई प्रेमाने सांगते, “ती माझ्या जिवलग मैत्रिणीसारखी आहे. आमच्यात औपचारिक नातेसंबंध नाही. आमच्याकडे अनेक डेट नाइट्स आहेत. आम्ही तिच्या आवडत्या रेस्टॉरंट वसाबीमध्ये जातो आणि तिचे आवडते जपानी जेवण घेतो. आम्ही दोघी एकमेकींना आमच्या आयुष्याबद्दल आणि जे काही सध्या सुरु आहे त्याबद्दल अपडेट करतो.” झनाई कबूल करते की तिची बेस्टी आशा तिच्या सर्व स्वप्नांना साथ देते. आशा आणि झनाईला एकत्र येऊन तणाव कमी करायला आवडते. झनाईने आणखी एक रहस्य उघड केले. आणि ते म्हणजे मानसिक, भावनिक आणि जवळजवळ शारीरिकदृष्ट्या दोघीही एकाच वयोगटातील आहेत. “माझी आजी शारीरिकदृष्ट्या ८९ वर्षांची झाली आहे, पण मनाने ती अजून २० वर्षांचीच आहे. तिचा वाढदिवस असतानाही आज तिने संपूर्ण कुटुंबासाठी खास जेवण बनवले! आणि आम्ही प्रत्येक पदार्थाचा आस्वाद घेतला.”
दीदींच्या निधनामुळे आम्ही सर्व कुटुंबीय अजूनही शोकात आहोत असे सांगून झनाई म्हणाली, कोविड आणि लता दीदींच्या जाण्यामुळे आम्हाला शहाणपण आले आहे. प्रत्येक वर्ष जात असताना, जीवन किती मौल्यवान आहे याची जाणीव होते. त्यामुळेच आम्ही तिच्या आयुष्याची ८९ वर्षे साजरी करण्याचे ठरवले.!”
त्यामुळेच, पूनम ढिल्लन, जॅकी श्रॉफ आणि इतर जवळच्या मित्रांनी घरी येऊन तिला शुभेच्छा दिल्या. आशा ताईंनी त्यांच्या आवडत्या फळांचा केक कापला. मीना मंगेशकर आणि आशाताई एकत्र येऊन त्यांच्या आवडीच्या चहाचा एकत्र चहाचा आस्वाद घेतला. आशाताईंकडे अजूनही त्यांच्या स्वप्नांची एक लांबलचक यादी आहे आणि त्या स्वप्नांच्या प्रतिकात्मक रुपातील ८९ मेणबत्त्या फुंकून त्या त्यांची स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्याचा निश्चय केला. मात्र माझ्या इच्छा ८९ पेक्षा जास्त आहेत असे आशाताईंनी डोळे मिचकावून सांगितले. आशा ताई म्हणाल्या, “मला नवीन गाणी गाण्याची इच्छा आहे, त्याशिवाय सर्व प्रकारच्या नवीन गोष्टी शिकायच्या आहेत… मला चित्रकलेचा आणखी पाठपुरावा करायचा आहे.. आणि हो, मला सीमेवरच्या जवानांना भेटायचे आहे… बाकी कभी और बताती हूं…”
फ्रेडरिक नीत्शेचा हवाला देऊन म्हणायचे झाले तर, “आणि ज्यांना नाचताना दिसले ते संगीत ऐकू येऊ न शकणार्यांना वेडे वाटले.”
आशाताईंना शुभेच्छा देऊन आम्ही निघताना, जर तुम्ही तुमचं आयुष्य पुरेसं जगलात, तर एकदा मिळालेल जीवनही पुरेसं आहे असा जीवनाचा धडा आमच्यासाठी सोबत घेऊन निघालो. मनात आशा ताई पुन्हा एकदा त्यांची आयुष्याचा धडा देणारी जादूची कांडी फिरवत असल्याचे रस्ताभर जाणवत होते.