Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगितीक मैफिल घडवणाऱ्या ‘अष्टपदी’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…

'अष्टपदी' हा मराठी चित्रपट पाहण्यासाठी आता प्रेक्षकांना फार वाट पाहावी लागणार नाही. ३० मे रोजी 'अष्टपदी' संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाची उत्कंठावर्धक झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: May 17, 2025 | 08:04 PM
सांगितीक मैफिल घडवणाऱ्या 'अष्टपदी'चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…

सांगितीक मैफिल घडवणाऱ्या 'अष्टपदी'चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…

Follow Us
Close
Follow Us:

‘अष्टपदी’ हा मराठी चित्रपट पाहण्यासाठी आता प्रेक्षकांना फार वाट पाहावी लागणार नाही. ३० मे रोजी ‘अष्टपदी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाची उत्कंठावर्धक झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘अष्टपदी’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रसिकांना एक संगीतप्रधान कौटुंबिक कलाकृती पाहायला मिळणार आहे. प्रदर्शित झालेल्या ‘अष्टपदी’च्या ट्रेलरच्या काव्यमय सुरुवातीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

‘आई तुळजाभवानी’चे कवडीमध्ये वास्तव्य, देवी कसा करणार असुरांचा नाश

महश्री प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशनच्या बॅनरखाली निर्माते उत्कर्ष जैन आणि महेंद्र पाटील यांनी ‘अष्टपदी’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही निर्माते उत्कर्ष जैन यांनीच केले आहे. क्रिएटिव्ह दिग्दर्शक महेंद्र पाटील यांनी कथा, पटकथा व संवाद लेखन केलं आहे. प्रदर्शित करण्यात आलेला ‘अष्टपदी’चा ट्रेलर खऱ्या अर्थाने चित्रपटाची झलक दाखवणारा आहे. ‘कुणीच नसावं अवतीभवती, समोर तू असताना…’ अशा काव्यरचनेने ‘अष्टपदी’चा ट्रेलर सुरू होतो. त्यानंतर संतोष जुवेकरच्या रूपातील कवीमनाचा नायक दिसतो आणि त्याने जिच्यासाठी हे काव्य म्हटले ती नायिका मयुरी कापडणेही लक्ष वेधून घेते. प्रेमाचे विविध रंग उधळणारी दृश्ये ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात, जी ‘अष्टपदी’बाबत उत्सुकता वाढवतात.

५५ सेकंद चित्तथरारक, ‘त्या’ घरातलं गुढ कसं उकलणार; ‘जारण’ चा टीझर पाहिला का?

थोडक्यात काय तर या चित्रपटात प्रेमाची अनोखी व्याख्या पाहायला मिळणार असल्याचे ट्रेलर पाहिल्यावर जाणवते. याला सुमधूर गीत-संगीत आणि अर्थपूर्ण संवादांची जोड देण्यात आली आहे. दोन नायक आणि एक नायिका असलेल्या या चित्रपटात खरं प्रेम कुणाला मिळतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सशक्त कथानक, उत्कंठा वाढवणारी पटकथा, सहजसुंदर अभिनय, प्रयोगशील दिग्दर्शन आणि दर्जेदार निर्मितीमूल्ये यांच्या आधारे ‘अष्टपदी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर गारूड घालण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘अष्टपदी’बाबत निर्माते-दिग्दर्शक उत्कर्ष जैन म्हणाले की, हा चित्रपट प्रेमाची नवी व्याख्या मांडणारा आहे. प्रेमाचे आजवर कधीही समोर न आलेले पैलू पाहताना प्रत्येक रसिकांना कुठे ना कुठे त्यात आपले प्रतिबिंब दिसेल. आजच्या काळातील नातेसंबंधांवर भाष्य करणारा हा चित्रपट म्हणजे सर्वतोपरी मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज असल्याचे ‘अष्टपदी’ पाहताना रसिकांना जाणवेल. ‘अष्टपदी’ या चित्रपटाला जर आर्थिक यश लाभलं तर त्यातील काही भाग राष्ट्रीय संरक्षण निधीला देणार असल्याचे उत्कर्ष जैन यांनी सांगितले.

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे यांना ‘माणिक रत्न’ पुरस्काराने सन्मानित

‘अष्टपदी’मध्ये संतोष आणि मयुरी यांच्या जोडीला अभिनय पाटेकर, मिलिंद फाटक, मोना कामत, स्वप्नील राजशेखर, माधव अभ्यंकर , विशाल अर्जुन, विनिता काळे, चंदा सारसेकर, कल्पना राणे, विशाल अर्जुन, उत्कर्ष जैन, महेंद्र पाटील, नयना बिडवे या कलाकारांचाही समावेश आहे. गणेश चेऊलकर आणि प्रशांत जामदार यांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण गीतरचनांना संगीतकार मिलिंद मोरे यांनी सुमधूर स्वरसाज चढवला आहे. मिलिंद मोरे यांनीच या चित्रपटाला पार्श्वसंगीतही दिलं असून, कला दिग्दर्शन निलेश रसाळ यांनी केलं आहे. रंगभूषा अतुल शिधये यांनी, तर वेशभूषा अंजली खोब्रेकर व स्वप्ना राऊत यांनी केली आहे. डिओपी धनराज वाघ यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून नृत्य दिग्दर्शन दिग्विजय जोशी यांनी केले आहे. अजय खाडे ‘अष्टपदी’चे कार्यकारी निर्माते आहेत, तर राहुल पाटील आणि नंदू आचरेकर सहदिग्दर्शक आहेत.

Web Title: Ashtapadi trailer unveiled a soulful tale of music and emotion releasing on may 30 across maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 08:04 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

‘खोताची वाडी – एक शापित वास्तु’ एकाच वेळी अनेक भाषांमध्ये उपलब्ध; ‘अल्ट्रा प्ले’, ‘अल्ट्रा झकास’वर सीरिज रिलीज
1

‘खोताची वाडी – एक शापित वास्तु’ एकाच वेळी अनेक भाषांमध्ये उपलब्ध; ‘अल्ट्रा प्ले’, ‘अल्ट्रा झकास’वर सीरिज रिलीज

‘रुबाब’च्या डॅशिंग लव्हस्टोरीचा ट्रेलर प्रदर्शित; तरुणाईच्या स्वॅगदार प्रेमाची ठसकेबाज झलक
2

‘रुबाब’च्या डॅशिंग लव्हस्टोरीचा ट्रेलर प्रदर्शित; तरुणाईच्या स्वॅगदार प्रेमाची ठसकेबाज झलक

मराठी अभिनेत्याने ‘अशी’ जाहीर केली लग्नाची तारीख, ‘या’ दिवशी गर्लफ्रेंडसोबत अडकणार विवाहबंधनात
3

मराठी अभिनेत्याने ‘अशी’ जाहीर केली लग्नाची तारीख, ‘या’ दिवशी गर्लफ्रेंडसोबत अडकणार विवाहबंधनात

प्रेम का भिती? मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर प्रेमकथेचा नवा अध्याय, सहवास’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; चाहत्यांची उत्सुकता वाढली
4

प्रेम का भिती? मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर प्रेमकथेचा नवा अध्याय, सहवास’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; चाहत्यांची उत्सुकता वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.