 
        
            सध्या धार्मिक सण उत्सवांचा काळ सुरु आहे. कोरोना महामारीनंतर सर्व सण उत्सव पूर्वीच्याच धामधुमीत सुरु झाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. यातच आता एका अभिनेत्रीने तिच्याकडे दर्शनासाठी पैसे मागितल्याचा आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
बॉलीवूड आणि साऊथ चित्रपटांमधील अभिनेत्री अर्चना गौतम (Archana Gautam) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘हसीना पारकर’, ‘बारात कंपनी’ यासारख्या चित्रपटात काम केलं असून सध्या ती चित्रपटांपासून दूर आहे. पण हस्तिनापूरमधून काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवल्यामुळे ती चर्चेत आली होती.
अर्चना गौतम हिचा ढसाढसा रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर = तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये तिरुमला तिरुपती देवस्थानमध्ये तिच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल तिने सांगितलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, तिला मंदिरातील काही कर्मचारी रेकॉर्डिंग करण्यापासून रोखत आहेत. यात अर्चना गौतम रडताना आणि किंचाळताना दिसत आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना अर्चना म्हणते की,’भारतातील हिंदू धार्मिक स्थळे लुटीची अड्डा बनली आहेत. तिरुपती बालाजीमध्ये (Tirupati Balaji) धर्माच्या नावाखाली महिलांसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या तिरुपती देवस्थानच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी. मी आंध्र सरकारला विनंती करतो आणि व्हीआयपी दर्शनाच्या नावावर एका व्यक्तीकडून १०,५०० घेतो. त्याची लूट थांबवा.’ अभिनेत्रीने ५ सप्टेंबरला ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
भारत के हिंदू धर्म स्थल लूट का अड्डा बन चुके हैं धर्म के नाम पर तिरुपति बालाजी मैं महिलाओं के साथ अभद्रता करते,यह टीटीडी के कर्मचारी पर कार्यवाही होनी चाहिए । मैं आंध्र गवर्नमेंट से निवेदन करती हूं।ओर यह VIP दर्शन के नाम पर 10500 एक आदमी से लेते है । इसे लूटना बंद करो । @INCIndia pic.twitter.com/zABFlUi0yL — Archana Gautam (@archanagautamm) September 5, 2022
तिरुपती देवस्थानने आरोप फेटाळला :
तिरुमला तिरुपती देवस्थानने अर्चना गौतमने व्हायरल व्हिडिओवर केलेले आरोप फेटाळले आहेत. उलट अभिनेत्रीनेच त्याच्यावर हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. अर्चनाने पोलिसांकडे केलेली तक्रारही खोटी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.






