Good News! Athiya Shetty आणि KL Rahul होणार आई-बाबा, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म
बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल लवकरच आई- बाबा होणार आहेत. या जोडप्याच्या घरी येत्या २०२५ या वर्षात चिमुकल्याचं आगमन होणार आहे. अथियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही ‘गोड बातमी’ चाहत्यांना दिली आहे. अथियाने तिच्या वाढदिवसानंतर तीन दिवसांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
काही तासांपूर्वीच आथियाने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत चाहत्यांना गोड बातमी शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री म्हणते, “आमचा सर्वात सुंदर आशीर्वाद २०२५ मध्ये येणार आहे…” असं सुंदर कॅप्शन अभिनेत्रीने दिले आहे. पोस्ट शेअर करताना अभिनेत्री हृदयांचं सिम्बॉलही दिलेलं आहे. लग्नाला दोन वर्षे पूर्ण होण्याआधीच आथिया- राहुलने सोशल मीडियावर आनंदाची बातमी शेअर केली आहे.
अथिया शेट्टी आणि केएल राहुल गेल्या अनेक वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होते. डेटिंग केल्यानंतर काही वर्षांतच त्यांनी आपल्या नात्याला नवा टॅग देण्याचा निर्णय घेतला. आथिया आणि राहुलने दोन वर्षांपूर्वी म्हणजेच, २३ जानेवारी २०२३ रोजी लग्नगाठ बांधली. या कपलचं लग्न सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर पार पडलं होतं. या लग्नाला फक्त दोघांचेही कुटुंबीय आणि क्रिकेटविश्वातील शिवाय फिल्म सिनेइंडस्ट्रीतीलही काही मोजकेच लोकं उपस्थित होते.
आथिया आणि राहुलने शेअर केलेल्या ‘गुड न्यूज’वर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. यामध्ये, रकुल प्रीत, अहान शेट्टी, सोनाक्षी सिन्हा, ईशा गुप्ता, शिबानी अख्तर, क्रिष्णा श्रॉफ यांसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करून अथिया आणि केएल राहुलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टीने ५ नोव्हेंबर रोजी तिचा ३२ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी तिला पोस्ट, इन्स्टा स्टोरी आणि मेसेजच्या माध्यमातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
हे देखील वाचा – हृदयाला स्पर्श करणाऱ्या निरागस प्रेमाची गोष्ट खुलणार, ‘कशी ओढ’ लव्ह साँग रिलीज
अथिया शेट्टीचा जन्म ५ नोव्हेंबर १९९२ रोजी झाला आहे. अथियाने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात २०१५ मध्ये आलेल्या ‘हीरो’ या सिनेमातून केली होती. मात्र, तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप ठरला. सुपरस्टारची मुलगी असूनही अथिया तिच्या करिअरमध्ये काही खास दाखवू शकली नाही. अथिया शेट्टीने आपल्या ४ वर्षांच्या कारकिर्दीत फक्त ४ चित्रपट केले आहेत. मात्र, अभिनेत्रीचे चारही सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगलेच फ्लॉप झाले. यानंतर तिने इंडस्ट्रीत काम करणे सोडून दिले.