डॉक्टर्स दिनानिमित्त (Doctors Day) आयुष्मान खुरानाने (Ayushman Khurana) त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिले आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘डॉक्टर जी’ (Doctor G) च्या टीमने चित्रपटातील त्याचा लूक सादर केला आहे. जंगली पिक्चर्सने (Junglee Pictures) या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभूती कश्यप (Anubhuti Kashyap) यांनी केले आहे. या कॅम्पस कॉमेडी ड्रामा चित्रपटात आयुष्मान खुराना पहिल्यांदाच स्त्रीरोग तज्ज्ञाची भूमिका साकारत आहे. तसेच बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि ज्येष्ठ अभिनेत्री शेफाली शाह त्याच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये असणार आहेत.
G se Gynecologist ??
G se Gupta✌️
That’s our #DoctorG ?⚕️ Doctor Uday Gupta aka #DoctorG and team ki taraf se wishing all the G se Genius doctors a Happy #DoctorsDay ✨@ayushmannk @Rakulpreet @ShefaliShah_ #SheebaChaddha @anubhuti_k#SumitSaxena @SaurabhBharat @vishalwagh21 pic.twitter.com/kQJjgAwEOq — Junglee Pictures (@JungleePictures) July 1, 2022
[read_also content=”सुरक्षिततेच्या कारणास्तव वरंध भोर घाट ‘या’ तारखेपर्यंत वाहतुकीसाठी बंद https://www.navarashtra.com/maharashtra/varandha-bhor-ghat-closed-for-traffic-till-30th-septrmber-nrsr-299282/”]
डॉक्टर्स दिनाच्या या विशेष प्रसंगी आयुष्मान खुराना यांनी सर्व मेहनती डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या आहेत. डॉक्टरच्या लूकसोबतच त्याने आपल्या चाहत्यांना डॉक्टर जी मधील ‘जी’ म्हणजे काय? हेदेखील सांगितले आहे.आयुष्मान खुरानाने आपल्या सोशल मीडियावर चित्रपटातील आपल्या लुकची लेटेस्ट झलक शेयर करताना लिहिले की, जी से गायनॅकोलॉजिस्ट, जीसे गुप्ता हेच आमचे ‘डॉक्टर जी’. डॉक्टर्स डे च्या सगळ्या डॉक्टर्सना शुभेच्छा.






