काय ती सपना, काय तो डान्स, लावलेत असे ठुमके; फॅन्सही गाण्यावर थिरके…
हरियाणाची डान्सिंग क्वीन सपना चौधरीचं नवीन गाणं 'बंदूक का रिवाज' रिलीज झालं आहे. ज्यामध्ये सपना चौधरीची जबरदस्त स्टाइल पाहायला मिळत आहे. या गाण्यात ती बंदूक घेऊन नाचताना दिसत आहे. हे गाणं सपना चौधरी आणि अभय बैसला यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. राज मावर आणि आशु ट्विंकल यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. तर फरिस्ता आणि काला नागुरा यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. सोनोटेक म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर हे गाणं प्रसारित केले जात आहे. हे गाणे आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.