Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिठी नदी स्वच्छतेला वेग! ५७ दिवसांत गाळ काढण्याचे लक्ष्य, ३१ मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश

मुंबईत मान्सूनपूर्व तयारीला वेग आला असून मिठी नदीसह नाल्यांच्या साफसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत. पालिकेने मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम तीन टप्प्यांत पूर्ण करण्यासाठी ५७ दिवसांची मुदत निश्चित केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 05, 2026 | 03:24 PM
कासुर्डी-भरतगाव तलावातील गाळ काढण्यावर नियमांना वाटाण्याच्या अक्षता? स्थानिक पातळीवर अनभिज्ञता

कासुर्डी-भरतगाव तलावातील गाळ काढण्यावर नियमांना वाटाण्याच्या अक्षता? स्थानिक पातळीवर अनभिज्ञता

Follow Us
Follow Us:
  • मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम तीन टप्प्यांत होणार असून ५७ दिवसांची मुदत निश्चित करण्यात आली आहे.
  • ३१ मेपर्यंत नालेसफाईची सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश अभियंते आणि कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.
  • कचरा समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी विविध ठिकाणी ‘ट्रॅश बूम’ यंत्रणा बसवण्याचे निर्देश दिले आहेत.
मिठी नदीसह नालेसफाईची मान्सूनपूर्व कामे सुरू असून, मिठी नदीतून गाळ काढण्याचे काम तीन टप्प्यांत केले जाणार आहे. या कामासाठी ५७ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून, अतिरिक्त पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ही कामे ३१ मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालिकेच्या अभियंता तसेच कंत्राटदारांना दिले आहेत. जर कामात हलगर्जीपणा बाळगला तर कडक कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे.

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये महिलांची आर्थिक क्रांती! २.२६ लाख महिलांनी उभारला स्वावलंबनाचा नवा मार्ग

अभिजीत बांगर यांनी मिठी नदीसह पूर्व उपनगरातील नालेसफाईच्या कामाचा पाहणीदौरा केला. यावेळी त्यांनी मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नियोजन केले पाहिजे, असे म्हटले. ज्या ठिकाणी घनदाट वस्ती आहे आणि मिठी नदीचा किनारा कमी आहे, तेथे विशेष लक्ष दिले पाहिजे. बीकेसी परिसरात एमएआरडीए कार्यालयाजवळ नदीचा किनारा रुंद आहे. या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये, याची खबरदारी घ्यावी तसेच असे झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले.

कामाच्या ठिकाणी अभियंत्यांची उपस्थिती अनिवार्य

स्वच्छता मोहिमा सुरू असताना कामाच्या ठिकाणी अभियंत्यांची उपस्थिती अनिवार्य असल्याचा, आदेश बांगर यांनी जारी केला आहे. कंत्राटदाराने केलेल्या कामात पारदर्शकता राखली जाईल, याची खात्री करण्यासाठी त्यांनी सदैव दक्ष राहणे आवश्यक आहे. कामामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळून आल्यास, संबंधित कंत्राटदार आणि अधिकारी या दोघांवरही कडक कारवाई केली जाईल.

कचरा साचणे रोखण्यासाठी ‘ट्रॅश बूम’ यंत्रणा बसवा

पाणी साचण्याची शक्यता असलेल्या क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले जावे, तसेच पावसाळ्याच्या काळात दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये पाणी साचणार नाही याची खात्री केली जावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. याव्यतिरिक्त, जिथे जिथे शक्य असेल तिथे, गटारांमधून वाहून जाणारा कचरा समुद्रापर्यंत पोहोचू नये यासाठी ‘ट्रॅश बूम’ यंत्रणा बसवण्यात यावी, असे निर्देश दिले.

Raigad News: रायगडच्या पर्यायी मार्गावर प्रश्नचिन्ह; कोट्यवधी खर्चानंतरही प्रवास धोकादायक, ग्रामस्थ संतप्त

कामाची सखोल तपासणी होणे आवश्यक

  • नाल्यांच्या साफसफाईचे काम कधी सुरू झाले आणि ते कधी पूर्ण होणे अपेक्षित आहे, याविषयीची माहिती पालिकेच्या डॅशबोर्डवर उपलब्ध करून दिली जावी, असे बांगर यांनी नमूद केले.
  • मिठी नदीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदाराने हाती घेतलेल्या कामाची सखोल तपासणी होणे आवश्यक आहे.
  • कामाचा दर्जा आणि त्यातील सातत्य, तसेच संगणक प्रणालीवर नोंदवलेली माहिती अद्ययावत राखली जाणे अनिवार्य आहे.
  • जर यात कसूर झाल्याचे आढळून आले, तर संबंधित कंत्राटदारावर योग्य ती कारवाई केली जाईल.

Web Title: Mumbai speeds up pre monsoon work mithi river desilting to be completed in 57 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Mithi River
  • Mumbai News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Kolhapur FDA Rules: कोल्हापुरात महाप्रसाद, जेवणावळींसाठी आता FDAची परवानगी बंधनकारक; नियम मोडल्यास कारवाई
1

Kolhapur FDA Rules: कोल्हापुरात महाप्रसाद, जेवणावळींसाठी आता FDAची परवानगी बंधनकारक; नियम मोडल्यास कारवाई

‘मराठी येत नाही? मग घ्या नोटीस!’ पहिल्याच दिवशी १,२६८ टॅक्सी-रिक्षा चालकांवर कारवाई; शिकण्यासाठी महिनाभराची मुदत
2

‘मराठी येत नाही? मग घ्या नोटीस!’ पहिल्याच दिवशी १,२६८ टॅक्सी-रिक्षा चालकांवर कारवाई; शिकण्यासाठी महिनाभराची मुदत

Chandrapur News: चंद्रपुरातील ‘बोडी’ होतायत नामशेष! पारंपरिक जलसंधारण व्यवस्थेवर मोठं संकट ; पुनरुज्जीवनाची गरज
3

Chandrapur News: चंद्रपुरातील ‘बोडी’ होतायत नामशेष! पारंपरिक जलसंधारण व्यवस्थेवर मोठं संकट ; पुनरुज्जीवनाची गरज

Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकमधील गाळ नाल्यात सोडल्याचा आरोप; पर्यावरणाच्या नुकसानीची भीती, नागरिक नाराज
4

Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकमधील गाळ नाल्यात सोडल्याचा आरोप; पर्यावरणाच्या नुकसानीची भीती, नागरिक नाराज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.