Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मन मोकळं, मूड आणि ट्रॅव्हल मोड ऑन करणारं ‘होऊया रिचार्ज’ गाणं रिलीज, नक्कीच येईल मैत्रीची आठवण

मैत्री आणि आत्मशोध यांचा सुंदर मेळ असणाऱ्या 'बंजारा' चित्रपटातील ‘होऊया रिचार्ज’हे स्फूर्तिदायी गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. तीन मित्रांची बाईकवरील अनोखी सफर गाण्यामध्ये दाखवण्यात आली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 26, 2025 | 02:34 PM
मन मोकळं, मूड आणि ट्रॅव्हल मोड ऑन करणारं 'होऊया रिचार्ज' गाणं रिलीज, नक्कीच येईल मैत्रीची आठवण

मन मोकळं, मूड आणि ट्रॅव्हल मोड ऑन करणारं 'होऊया रिचार्ज' गाणं रिलीज, नक्कीच येईल मैत्रीची आठवण

Follow Us
Close
Follow Us:

स्नेह पोंक्षे दिग्दर्शित ‘बंजारा’चित्रपट येत्या १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपटाची जोरदार चर्चा रंगलीये. मैत्री आणि आत्मशोध यांचा सुंदर मेळ असणाऱ्या ‘बंजारा’ चित्रपटातील ‘होऊया रिचार्ज’हे स्फूर्तिदायी गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. तीन मित्रांची बाईकवरील अनोखी सफर गाण्यामध्ये दाखवण्यात आली आहे.

‘हिरामंडी’तील आलमजेब होणार लवकरच आई, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी बनणार आजोबा

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक शान आणि अवधूत गुप्ते यांच्या कमाल आवाजातील या गाण्याला गुरू ठाकूर यांच्या शब्दांची आणि अवधूत गुप्ते यांच्या संगीताची जोड लाभली आहे. स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात मित्रांची धमाल दिसत असतानाच निसर्गसौंदर्यही अनुभवायला मिळत आहे. प्रत्येकाला आपल्या मैत्रीची आठवण करून देणारे हे गाणे पाहायला जितके सुखावह आहे तितकेच श्रवणीय आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक स्नेह पोंक्षेंनी सांगितले की,” ‘होऊया रिचार्ज’गाण्यात केवळ प्रवासच नाही तर आत्मशोध घेण्याची प्रेरणा दाखवण्यात आली आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात जिथे आपण थोडे थांबून स्वतः कडे पाहायला विसरतो, तिथे हे गाणं थोडं थांबायला आणि रिचार्ज व्हायला सांगतं. गाणे तयार करताना प्रत्येक फ्रेममध्ये सफर जिवंत वाटावी, यासाठी खूप मेहनत घेतली आहे. हे गाणे ऐकून प्रेक्षकांना मित्रांसोबत असा एखादा प्रवास करावा, असे वाटल्याशिवाय राहणार नाही. ”

“दारूच्या व्यसनाने त्याला संपवलं…” Ex पतीच्या निधनानंतर अभिनेत्री शुभांगी अत्रेची पहिली प्रतिक्रिया

चित्रपटाविषयी निर्माते शरद पोंक्षे यांनी सांगितले की, ” ‘होऊया रिचार्ज’गाण्यातून आम्हाला ऊर्जा आणि सकारात्मकता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे. काहींना हे गाणे नॉस्टॅलजिक बनवेल तर काहींना आपल्या मित्रांसोबत एखाद्या सहलीचे आयोजन करण्याची इच्छा निर्माण करेल. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती हा ‘बंजारा’ असतो. फक्त त्याला याची जाणीव होणे गरजेचे आहे. असं म्हणतात, प्रवासात माणूस नव्याने सापडतो. हेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून आणि गाण्यातून केला आहे.”

‘बंजारा’ चित्रपटाची वी. एस. प्रॉडक्शन्स आणि मोरया प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. तर या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षे यांनी केले आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज हे कलाकार आहेत. तर रोहिणी विजयसिंह पटवर्धन निर्माती असून शरद पोंक्षे प्रस्तुत हा चित्रपट १६ मे ला प्रदर्शित होत आहे

Web Title: Bharat jadhav sharad ponkshe and sunil barve starrer banjara marathi movie houya recharge song released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • Bharat Jadhav
  • marathi film
  • marathi movie
  • Road trip

संबंधित बातम्या

एक बहुआयामी व्यक्तीमत्व; चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
1

एक बहुआयामी व्यक्तीमत्व; चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

‘जिप्सी’ विशेष प्रदर्शन गाजलं! प्रेक्षकांनी दिला भरभरून प्रतिसाद; प्रशांत साजणीकरांची मुलाखत चर्चेत
2

‘जिप्सी’ विशेष प्रदर्शन गाजलं! प्रेक्षकांनी दिला भरभरून प्रतिसाद; प्रशांत साजणीकरांची मुलाखत चर्चेत

फिरसत्या देवाचा कोप अन् रहस्यमयी, गूढ कहाणी; ‘असुरवन’ चित्रपटाचा शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चा
3

फिरसत्या देवाचा कोप अन् रहस्यमयी, गूढ कहाणी; ‘असुरवन’ चित्रपटाचा शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चा

परदेशात फुलला मराठी रोमान्स!‘आसा मी अशी मी’ चा पोस्टर लाँच, डॅशिंग लूकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष
4

परदेशात फुलला मराठी रोमान्स!‘आसा मी अशी मी’ चा पोस्टर लाँच, डॅशिंग लूकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.