अभिजित सावंतच्या 'चाल तुरु तुरु' गाण्याची सोशल मीडियावर तुफान क्रेझ, काही दिवसांतच मिळाले लाखो व्ह्यूज
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझननंतर अभिजीत सावंत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १९७४ साली गायक जयवंत कुलकर्णी यांनी ‘ही चाल तुरु तुरु’ हे गाणं गायलं होतं. हे गाणं आजही सोशल मीडियावर तुफान ट्रेंडिंगवर आहे. आता त्याच गाण्याचं नवं व्हर्जन क्रिएट करण्यात आलं आहे. २ मे ला हे गाणं सोशल मीडियावर रिलीज झालं असून या गाण्याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. ‘चाल तुरु तुरु’ ह्या गाण्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा उपविजेता अभिजित सावंत चर्चेत आला आहे.
नवाजुद्दीन सिद्दिकीने बॉलिवूडला राम राम ठोकला? केली थेट पोलखोल
‘चाल तुरु तुरु’ हे गाणं गायक अभिजित सावंत आणि सोनाली गायकवाडने गायलं आहे. या गाण्याची प्रेक्षकांमध्ये तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे. जुन्या गाण्या प्रमाणेच या नव्या गाण्यालाही प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळत आहे. अभिजितने प्रेक्षकांना जुन्या गाण्याच्या नव्या ट्विस्टने आणि त्याच्या सदाबहार आवाजाने मंत्रमुग्ध केलं आहे. शिवाय त्याच्या जादूई आवाजाने पुन्हा एकदा प्रेक्षकांवर भुरळ पडली आहे. दरम्यान, अभिजितच्या “चाल तुरु तुरु” या गाण्याला एक नवा स्पिन ट्विस्ट देत हे गाणं ट्रेंड मध्ये आलं आहे. जुन्या गाण्याची मज्जा काही औरच असते आणि अश्यातच प्रेक्षकांना हे गाणं एवढं आवडलं की हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय.
“लग्नाच्या ४- ५ वर्षांनंतर घटस्फोट झाला आणि…”, Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
“चाल तुरु तुरु” गाण्यानं अभिजीतच्या आवाजाची जादू कायम आहे हे दाखवून दिलंय. पण सध्या हे गाणं यूट्यूबवर ३ नंबर वर ट्रेंड होताना दिसतंय. एवढंच नाही तर या गाण्याला ६ लाखांहून अधिकचे व्ह्यूज सुद्धा मिळाले आहेत. गाण्याचे बोल जुने असले तरी आजच्या तरुणाईला या जुन्या गाण्याची भुरळ पडली अस म्हण्याला हरकत नाही. इंडियन आयडॉलच्या पहिल्या सीझनपासून अभिजीतच्या सांगतिक प्रवासाला सुरुवात झाली आणि आज हा संगीत विश्वातला त्याचा प्रवास २० वर्ष पूर्ण करत असताना पुन्हा एकदा प्रेक्षकांना त्यानं मोहित केलं आहे. “बिग बॉस मराठी”च्या पाचव्या सीझननंतर प्रेक्षकांना अभिजीत काय नवीन करणार याची उत्सुकता होती. अखेर त्याचं गाणं रिलीज होताच प्रेक्षकांना त्याचं नवं गाणं पसंतीस पडतंय. “चाल तुरु तुरु” सारख्या जुन्या गाण्याला नवा स्पिन ट्विस्ट देणं देखील तितकच आव्हानात्मक होत पण प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देण्याचा दृष्टीने हे गाणं अभिजीत ने केलं आणि आता प्रेक्षक त्याला भरभरून प्रेम देतात. एकंदरीत काय अभिजीतने आजवर त्यांचा प्रेक्षकांना नवनवीन गाण्याची मेजवानी तर दिली पण आता तो पुन्हा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजव ताना दिसतोय.