Swapnil Joshi Talked About His First Divorce He Separated In 5 Years After Marriage
मराठी इंडस्ट्रीमध्ये ‘चॉकलेट बॉय’ म्हणून नावारुपाला आलेल्या स्वप्नील जोशीने त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं आहे. मराठी चित्रपट, नाटक, मालिका आणि वेबसीरीजच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेल्या स्वप्नीलने त्याच्या फिल्मी करियरमध्ये अनेकदा प्रेम या संकल्पनेवर आधारितच भूमिका साकारलीये. कायमच प्रेमावर आधारित भूमिका साकारणाऱ्या स्वप्नीलने प्रेम, लग्न, रिलेशनशिप आणि घटस्फोट या गोष्टीवर भाष्य केलं आहे. नुकतंच अभिनेत्याने ‘देंट ऑड इंजिनियरिंग’ नावाच्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल आणि घटस्फोटाबद्दल भाष्य केलं आहे.
पहिल्या प्रेमाबद्दल आणि घटस्फोटाबद्दल बोलताना स्वप्नील जोशी म्हणाला की, “मला नववीत असताना एक मुलगी आवडत होती. पण तेव्हा नेमकं काय घडतंय, हे कळत नव्हतं. मुलगी आवडते म्हणजे नक्की काय? याची मला समज नव्हती. त्यानंतर कॉलेजमध्ये अकरावी- बारावीला असताना एक मुलगी आवडायची. आमचं सिरीयस अफेयर होतं. पण ते रिलेशन काही कारणांनी मोडलं. आमच्या नातं भविष्यात पुढे जाणारंच नाही, म्हणून आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला नाही. त्याचं काही दिवस दु:खं झालेलं. त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा एका मुलीसोबत माझं अफेअर झालं होतं. ज्या मुलीसोबत अफेअर केलं, तिच्याच सोबत लग्नही केलं. पण चार ते पाच वर्षानंतर आमचा घटस्फोट झाला.”
दुसऱ्या लग्नाबद्दल सांगताना स्वप्नीलने सांगितलं की, “त्यानंतर काही दिवसांनी माझं दुसरं लग्न झालं. मी, माझी बायको आणि दोन मुलं असा माझा छोटा परिवार आहे. आमचा सुखी संसार सुरु आहे. ” पुढे स्वप्नीलला “घटस्फोट घेताना लोक काय म्हणतील, हा विचार मनात आला का?” असा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर उत्तर देताना स्वप्नील म्हणाला की, “माझा घटस्फोट होत होता, तेव्हा सोशल मीडिया नव्हतं. तेव्हा प्रिंट आणि टेलिव्हिजन मीडिया होतं. पण, मराठीतील एकाही प्रिंट पत्रकाराने माझ्या घटस्फोटाची बातमी पेपरमध्ये छापली नव्हती. आणि हे मी नेहमी अभिमानाने सांगतो. घटस्फोट हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. अनेक सेलिब्रिटींना सोशल मीडिया पोस्ट टाकाव्या लागतात, की आम्हाला प्रायव्हसी द्या. एक जोडपं जेव्हा वेगळं होतं तेव्हा ते खूप यातनेतून जात असतं. ते दोघेही… चूक कोण आणि बरोबर कोण ? हे कोणीही ठरवू शकत नाही. फक्त द्या दोघांना माहीत असतं की काय घडलंय. तिसऱ्या माणसाला खरंच माहीत नसतं की खरं काय घडलंय…किंवा का वेगळे होत्यात. ती त्यांची लढाई लढत असतात. त्यात आपण त्यांचा त्रास कमी करत नसलो तर निदान वाढवूया तरी नको.”
‘जय पाकिस्तान!’ राखी सावंतचा Video पाहून भारतीयांचा संताप, अभिनेत्रीला देशाबाहेर हाकलण्याची मागणी
मराठी इंडस्ट्रीचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणून नावारुपाला आलेल्या स्वप्नीलने आपल्या सिनेकरियरमध्ये रोमँटिकसह वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटामध्ये काम केले. त्याचे सर्वाधिक चित्रपट चर्चेत राहिलेले ते रोमँटिक भूमिकांचे. ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘मुंबई पुणे मुंबई २’, ‘मुंबई पुणे मुंबई ३’, ‘दुनियादारी’, ‘मितवा’, ‘तू हि रे’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ या प्रेमावर आधारित असलेल्या चित्रपटांमुळे त्याला विशेष प्रसिद्धी मिळाली. याशिवाय सुद्धा वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये आणि वेबसीरिजमध्ये स्वप्नीलने काम केलं आहे.