Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर ठरलं! सौरव गांगुलीचा बायोपिक येतोय, प्रमुख भूमिकेत दिसणार ‘हा’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता…

सचिन तेंडुलकर आणि महेंद्र सिंग धोनी यांच्यानंतर BCCI चे माजी अध्यक्ष आणि भारतीय संघाचे माजी खेळाडू, माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या जीवनावर बायोपिक येतोय. याबद्दलची माहिती स्वत: सौरव गांगुलीने आपल्या चाहत्यांना दिली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 21, 2025 | 04:05 PM
अखेर ठरलं! सौरव गांगुलीचा बायोपिक येतोय, प्रमुख भूमिकेत दिसणार 'हा' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता...

अखेर ठरलं! सौरव गांगुलीचा बायोपिक येतोय, प्रमुख भूमिकेत दिसणार 'हा' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता...

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि BCCI चे माजी अध्यक्ष म्हणून सर्व सामान्यांमध्ये सौरव गांगुलीची ओळख आहे. क्रिकेटर सौरव गांगुलीचे नाव टीम इंडियाच्या सर्वोत्तम कर्णधारांमध्ये घेतले जाते. अशा या लोकप्रिय खेळाडूचा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला बायोपिक येत आहे. सचिन तेंडुलकर आणि महेंद्र सिंग धोनी यांच्यानंतर BCCI चे माजी अध्यक्ष आणि भारतीय संघाचे माजी खेळाडू, माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या जीवनावर बायोपिक येतोय. याबद्दलची माहिती स्वत: सौरव गांगुलीने आपल्या चाहत्यांना दिली आहे.

भर थंडीत आणि बर्फात पुशअप्स करताना दिसला बॉलिवूड अभिनेता, ५९ वर्षीय मिलिंद सोमणची फिटनेस तरुणांनाही देतेय टक्कर

आपल्या चाहत्यांमध्ये क्रिकेटचा ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सौरव गांगुलीची भूमिका कोण साकारणार ? याची माहिती क्रिकेटरने स्वत: दिली आहे. सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव दिसणार आहे. राजकुमार माजी क्रिकेटर सौरव गांगुलीची भूमिका साकारणार आहे. गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये माध्यमांशी बोलताना सौरभ गांगुलीने सांगितले की, “मी जे ऐकले आहे त्यानुसार, राजकुमार राव मुख्य भूमिका साकारणार आहे. परंतु सध्या तारखेचा घोळ असल्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आणखी बरेच दिवस लागण्याची शक्यता आहे.”

१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवाची दमदार सुरुवात, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या हस्ते उद्घाटन…

क्रिकेटर सौरव गांगुलीचं भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वाचं योगदान आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने मोठ्या प्रमाणावर यश संपादन केले होते. बायोपिकमध्ये क्रिकेटरचं वैयक्तिक आयुष्य आणि त्याचं मैदानातील नेतृत्व याबाबत चित्रण असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ११३ कसोटी आणि ३११ एकदिवसीय सामने खेळणारा सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष ते कर्णधार म्हणून त्याचं एक यशस्वी व्यक्तिमत्व आहे. त्याने आपल्या करियरमध्ये अनेक क्रिकेट सामने भारताला जिंकवून दिले आहेत. क्रिकेट जगतात ‘दादा’म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौरव गांगुलीच्या भूमिकेत बॉलिवूडमधील चतुरस्र आणि प्रयोगशील अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेला राजकुमार राव दिसणार आहे.

Emergency: कंगनाचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट या दिवशी होणार OTT वर प्रदर्शित; अभिनेत्रीने स्वतः दिले अपडेट!

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावने अनेक चित्रपटांतून आपले अभिनय कौशल्य चाहत्यांना दाखवून दिलेले आहे. त्यामुळे तो सौरव गांगुली कसा साकारतो, याबद्दल चाहत्यांना कमालीची उत्सुकता लागून राहिली असेल. सौरभ गांगुलीच्या बायोपिकच्या आधी राजकुमार रावचा ‘भूल चुक माफ’ या आगामी चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री वामिका गब्बीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. याशिवाय राजकुमारकडे ‘मलिक’ नावाचाही चित्रपट आहे, ज्यामध्ये तो अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. तो चित्रपट यावर्षीच रिलीज होण्याची शक्यता आहे. तर ‘टोस्टर’मध्ये राजकुमार कंजूस पतीच्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत सान्या मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Bollywood sourav ganguly biopic rajkummar rao plays lead role in upcoming movie cricketer reveals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 04:05 PM

Topics:  

  • Bollywood
  • bollywood movies
  • rajkumar rao
  • Sourav Ganguly

संबंधित बातम्या

मस्ती 4 मधून काढून टाकले ‘हे’ सीन, 6 डायलॉग्समध्ये केले बदल, सेन्सॉर बोर्डाने दिले ‘A’ सर्टिफिकेट
1

मस्ती 4 मधून काढून टाकले ‘हे’ सीन, 6 डायलॉग्समध्ये केले बदल, सेन्सॉर बोर्डाने दिले ‘A’ सर्टिफिकेट

अखेर चाहत्यांची संपणार प्रतीक्षा; दयाबेनचा लवकरच होणार तारक मेहतामध्ये कमबॅक, टपूने स्वतःच दिली माहिती
2

अखेर चाहत्यांची संपणार प्रतीक्षा; दयाबेनचा लवकरच होणार तारक मेहतामध्ये कमबॅक, टपूने स्वतःच दिली माहिती

‘१२० बहादुर’च्या सेन्सॉर प्रमाणपत्राविरुद्ध याचिका दाखल, फरहान अख्तरचा चित्रपट का अडकला अडचणीत ?
3

‘१२० बहादुर’च्या सेन्सॉर प्रमाणपत्राविरुद्ध याचिका दाखल, फरहान अख्तरचा चित्रपट का अडकला अडचणीत ?

आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’मधून समीर वानखेडेचा सीन आला हटवण्यात, दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आदेश
4

आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’मधून समीर वानखेडेचा सीन आला हटवण्यात, दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.