फोटो सौजन्य: मिलिंद सोमण इन्स्टाग्राम
बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण कायमच आपल्या फिटनेसमुळे कायमच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो. तो त्याच्या हेल्थमुळे चाहत्यांमध्ये जबरदस्त चर्चेत राहिला आहे. शिवाय तो, डाएट आणि नियमित व्यायामही करत असतो. अनेकदा मिलिंद आपल्या इन्स्टाग्रामवर जिममधील किंवा रनिंग करत असतानाचे काही व्हिडिओ किंवा फोटो शेअर करत असतो. अशातच अभिनेता मिलिंद सोमणने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो बर्फाच्छादित प्रदेशामध्ये पुशअप्स करताना दिसत आहे. ऐन बर्फामध्ये अभिनेत्याला पुशअप्स करताना पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. त्याचा हा पुशअप्सचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होतोय.
मिलिंदचा एक नवीन व्हिडिओ सध्या सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे. व्हिडिओमध्ये मिलिंद बर्फाच्छादित प्रदेशात टी-शर्टशिवाय पुशअप्स करताना दिसत आहे. मिलिंद सोमणच्या फिटनेसच्यासमोर २५ वर्षाचे तरुणही फिके पडतील, अशी त्याची फिटनेस आहे. ५९ वर्षांचा मिलिंद सोमण एक हेल्दी लाइफस्टाइल जगतो, तो कायमच फिजिकली खूप ॲक्टिव्ह असतो. आपल्याला सदृढ आरोग्य मिळावे यासाठी अभिनेता जिममध्ये न जाता स्वतःहून कठोर परिश्रम करतो. मिलिंद सोमण यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मिलिंद सोमण सध्या नॉर्वेमधील ट्रॉस्मो येथे आहेत. तिथे सकाळी लवकर उठून त्यांनी पुशअप्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
‘डाकू महाराज’मधील एका गाण्यासाठी उर्वशी रौतेलाने घेतले कोट्यवधी रुपये, मानधन ऐकून व्हाल चकित!
शेअर केलेल्या व्हिडिओतील मिलिंदची स्टाईल आणि लूक पाहून फॅन्स आश्चर्यचकित झाले आहेत. लोकांनी त्यांच्या या व्हिडिओचे वर्णन प्रेरणादायी असे केले आहे. ‘तुमच्या फिटनेसचं कौतुक करावं तितकं कमी आहे.’, ‘इतक्या थंड वातावरणात तुम्ही तिकडे पुशअप्स मारत आहेत, इथे आम्हाला थंडी वाजतेय.’, ‘तुम्ही सध्याच्या तरुणपिढीसाठी इन्स्पिरेशन आहे.’ तर काहींनी त्यांच्याकडून हेल्थ टिप्सही मागितल्या आहेत. आपल्या फिटनेसमुळे बॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेल्या मिलिंद सोमण यांचा वयाच्या ५९ वर्षीही फिटनेस कमालीचा आहे. त्यांचा फिटनेस फंडा ते नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असतात. मिलिंद सोमण त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिले आहेत. पहिलं लग्न मोडल्यानंतर २६ वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोनवारसोबत त्यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला ५ वर्ष पूर्ण झाली आहेत.
जनसामान्यांपासून दुर्लक्षित राहिलेला इतिहास रंगभूमीवर…’रणरागिणी ताराराणी’ नाटकाचा दिमाखदार शुभारंभ