Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आखरी सवाल’ची दमदार झलक; Sanjay Dutt मुख्य भूमिकेत, इतिहासावर थेट प्रश्न उपस्थित करणारी कथा

‘आखरी सवाल' संजय दत्त यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची झलक अखेर निर्मात्यांनी शेअर केली आहे. अशातच हा चित्रपट येत्या ८ मे २०२६ रोजी संपूर्ण सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 02, 2026 | 01:03 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘आखरी सवाल’ची दमदार झलक
  • Sanjay Dutt मुख्य भूमिकेत
  • इतिहासावर थेट प्रश्न उपस्थित करणारी कथा
 

एक असा चित्रपट जो शंभर वर्षांहून अधिक काळ देशाला आणि येथील तरुणांना गुंतवून ठेवणाऱ्या प्रश्नांना विचारण्याचे धाडस करतो. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या ‘आखरी सवाल’ची झलक प्रदर्शित झाली आहे. यात संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसणार असून निर्मिती निखिल नंदा यांनी देखील यामध्ये काम केले आहे.

महात्मा गांधी यांच्या निधनानंतर लावण्यात आलेल्या बंदीपासून ते बाबरी मशीद पाडल्याच्या आरोपांपर्यंत, ‘आखरी सवाल’ असे गंभीर प्रश्न उपस्थित करते ज्यांची उत्तरे लोक दीर्घकाळ शोधत आहेत. धाडसी आणि स्पष्ट मांडणी करणारी ही झलक इतिहासाच्या खोलात उतरते आणि संपूर्ण देशात नवी चर्चा निर्माण करणारी कथा मांडते.

स्वामींच्या कृपेने ‘सनई चौघडे’चा पहिल्याच आठवड्यात दबदबा; टॉप 10 मध्ये मालिकेने मिळवले स्थान

संजय दत्त यांच्यासोबत अमित साध, नमाशी चक्रवर्ती, समीरा रेड्डी, नीतू चंद्रा आणि त्रिधा चौधरी यांसारख्या कलाकारांनी सजलेला ‘आखरी सवाल’ हा प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरला आहे. निर्मात्यांनी हनुमान जन्मोत्सवाच्या शुभमुहूर्तावर (२ एप्रिल, सकाळी ११:११ वाजता) ही झलक प्रदर्शित केली असून ती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ही बहुप्रतीक्षित झलक चित्रपटाच्या विषयाची प्रभावी झलक दाखवते. देशाला पाहण्याची गरज असलेल्या दडलेल्या कथांच्या स्तरांना उलगडण्याचा प्रयत्न यात दिसतो. थेट आणि संवादात्मक शैलीतील ही झलक चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आणखी मोठी चर्चा निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.

 

चित्रपटाची कथा ही विक्कीच्या पात्राभोवती फिरते आहे, जो हुशार पण थोडा तापट स्वभावाचा संशोधक आहे आणि प्रगत भारताचे स्वप्न पाहणारा महत्वाकांक्षी तरुण आहे. त्याचा संशोधन प्रबंध नाकारल्यानंतर तो आपल्या मार्गदर्शक प्राध्यापक गोपाल नडकर्णी यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करतो. सुरुवातीला शैक्षणिक वाद असलेला हा विषय पुढे राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरील चर्चेत बदलतो. चित्रपट भारतातील तरुणांच्या मनात निर्माण होणारे प्रश्न, त्यांची आशा, शंका आणि इतिहासातील घटनांमधून सत्य शोधण्याची धडपड दाखवण्यात आली आहे

‘आखरी सवाल’च्या कथानकाचा गाभा गुरु-शिष्य यांच्यातील संघर्षावर आधारित आहे. विक्कीची सततची प्रश्नांची मालिका एका खोल वैयक्तिक सत्याचा उलगडा करते. अखेरीस तो विचारलेला ‘आखरी सवाल’ शतकभर जुन्या गुपितावर प्रकाश टाकतो जे प्राध्यापकांना योग्य ठरवू शकते किंवा दोघांच्याही आयुष्याला कलाटणी देऊ शकते.

हनुमान जयंतीनिमित्त ‘Varanasi’च्या निर्मात्यांनी चाहत्यांना दिले सरप्राईज; बजरंगबलींबाबत व्यक्त केली भावना

दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांनी २०२१ मध्ये ‘पिकासो’ या मराठी चित्रपटातून दिग्दर्शनाची सुरुवात केली होती आणि त्यासाठी त्यांना ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष उल्लेखही मिळाला होता. ‘डेजा वू’, ‘प्रेम प्रथा धूमशान’, ‘पिकोलो’ आणि ‘वर्चुअल रियलिटी’ यांसारख्या प्रकल्पांमधून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

‘निखिल नंदा मोशन पिक्चर्स’च्या बॅनरखाली साकारलेला हा चित्रपट निखिल नंदा सादर करत आहेत. चित्रपटाचे सहनिर्माते पुनीत नंदा, डॉ. दीपक सिंह, गौरव दुबे आणि उज्ज्वल आनंद आहेत. कथा, पटकथा आणि संवाद उत्कर्ष नैथानी यांनी लिहिले असून, संगीत मॉन्टी शर्मा यांनी दिले आहे, तर गीतलेखन कुमार विश्वास यांनी केले आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद उत्कर्ष नैथानी यांनी लिहिले आहेत. संगीत मोंटी शर्मा यांनी दिले असून गीतलेखन कुमार विश्वास यांनी केले आहे. ‘आखरी सवाल’ ८ मे २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे

Web Title: Aakhri sawal teaser sanjay dutt unravel history unsolved final question first glimpse revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Sanjay Dutt

संबंधित बातम्या

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
1

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा
2

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
3

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
4

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.