Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bollywood News: पडद्यापलीकडची कमाई! अभिनयासोबत व्यवसायातही मोठं नाव कमावणारे ‘हे’ आहेत बॉलिवूड स्टार्स

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी अभिनयासोबतच व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाहरुख खान, अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम, रणबीर कपूर, कतरिना कैफ, दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट यांनी फॅशन, ब्युटी, स्पोर्ट्स, तंत्रज्ञान, फूड आणि स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रांत व्यवसाय उभे केले किंवा गुंतवणूक केली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 08, 2026 | 12:42 PM
Bollywood News: पडद्यापलीकडची कमाई! ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Bollywood News: पडद्यापलीकडची कमाई! ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शाहरुख खानपासून आलिया भट्टपर्यंत अनेक कलाकार व्यवसायविश्वात सक्रिय आहेत.
  • फॅशन, ब्युटी, स्पोर्ट्स, फूड आणि टेक्नॉलॉजी अशा विविध क्षेत्रांत सेलिब्रिटींची गुंतवणूक.
  • अभिनयासोबत स्वतःचे ब्रँड, कंपन्या आणि स्टार्टअप्स उभारण्याकडे बॉलिवूड कलाकारांचा वाढता कल.
 

Bollywood Celebrities Who Built Successful Businesses:  आजचा अभिनेता फक्त कॅमेऱ्यासमोर दिसत नाही, तर कॅमेऱ्याच्या मागेही आपली जागा निर्माण करत आहे. चित्रपटांमधून मिळणाऱ्या प्रसिद्धीचा वापर अनेक कलाकार आता स्वत:चे ब्रँड, कंपन्या आणि स्टार्टअप्स उभे करण्यासाठी करत आहेत. फॅशनपासून स्पोर्ट्सपर्यंत आणि ब्युटीपासून तंत्रज्ञानापर्यंत त्यांची गुंतवणूक पाहायला मिळते.

शाहरुख खान (Shah Rukh Khan ) : किंग खानचा बिझेनस गेम

शाहरुख खान यांचे नाव केवळ सुपरस्टार म्हणून घेतले जात नाही, तर यशस्वी व्यावसायिक म्हणूनही त्यांची ओळख आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या माध्यामातून त्यांनी निर्मिती आणि व्हिज्युअल इफेक्ट्सच्या क्षेत्रात मोठी मजल मारली. याशिवाय क्रिकेटमध्ये ग्लोबल नाइट रायडर्सशी त्यांचा संबध आहे. मुलगा आर्यन खानसोबत ते D’YAVOL या लक्झरी ब्रँडशीही जोडले गेले आहेत. शिक्षण आणि मनोरंजन यांचा मेळ घालणाऱ्या KidZaniaमध्येही त्यांची गुंतवणूक आहे.

अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) : खेळ आणि स्टार्टअप्सवर भर

अभिषेक बच्चन यांनीही आपल्या कमाईचा आणि प्रसिद्धीचा वेगळ्या पद्धतीने वापर केला आहे. जयपूर पिंक पँथर्स आणि चेन्नईयिन एफसी या क्रीडा संघांशी त्यांचा संबंध आहे. याशिवाय युरोपियन T20 लीगमध्येही त्यांनी रस दाखवला आहे. Swiggy, VAHDAM Teas आणि Naagin Sauce यांसारख्या व्यवसायांमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. तंत्रज्ञान आणि किरकोळ व्यवसायातील काही नव्या कंपन्यांनाही त्यांनी पाठिंबा दिला आहे.(Bollywood News:)

जॉन अब्राहम (John Abraham) : स्पोर्ट्सपासून कॉफीपर्यंत

जॉन अब्राहम हा पडद्यावर फिटनेस आणि अॅक्शनसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता आहे. मात्र व्यवसायाच्या बाबतीतही त्याने आपली वेगळी वाट तयार केली आहे. JA Entertainment या निर्मिती संस्थेसोबतच ते NorthEast United FC शी जोडलेले आहेत. मोटरस्पोर्ट्समध्येही त्यांनी गुंतवणूक केली आहे. याशिवाय Subko Coffee, NOTO Ice Cream आणि Epigamiaसारख्या नव्या ब्रँड्समध्ये त्यांचा सहभाग आहे.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) : फॅशन आणि स्टार्टअप्सकडे वळला

कपूर कुटुंबाचा अभिनयाचा मोठा वारसा असला तरी रणबीर कपूरने स्वतःची व्यावसायिक बाजू तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. ARKS या फॅशन ब्रँडच्या माध्यमातून त्याने या क्षेत्रात प्रवेश केला. फुटबॉलमध्ये Mumbai City FC सोबतही तो जोडला गेला आहे. याशिवाय Prozo, DroneAcharya, Beco आणि Svami यांसारख्या वेगवेगळ्या स्टार्टअप्समध्ये त्याने गुंतवणूक केली आहे.

कतरिना कैफ (Katrina Kaif) : सौंदर्यविश्वात स्वतःचा ब्रँड

कतरिना कैफने आपल्या लोकप्रियतेचा योग्य वापर करत ब्युटी इंडस्ट्रीमध्ये स्वतःची जागा निर्माण केली. Nykaaसोबत सुरू केलेल्या Kay Beauty या ब्रँडला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. भारतीय बाजारपेठेनंतर या ब्रँडने यूकेमध्येही प्रवेश केला असून Space NKच्या माध्यमातून त्याची आंतरराष्ट्रीय उपस्थिती वाढली आहे.

दीपिका पादुकोण (Deepika Padukone) : गुंतवणुकीचा मोठा विस्तार

दीपिका पादुकोणने व्यवसायाच्या बाबतीत एकाच क्षेत्रावर अवलंबून न राहता विविध ठिकाणी पाऊल टाकले आहे. 82°E या स्किनकेअर ब्रँडसोबत तिचे नाव जोडले गेले आहे. KA Productions ही तिची निर्मिती संस्था आहे. याशिवाय Blue Tokai Coffee Roasters, Nua आणि Bellatrix Aerospaceसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये तिने गुंतवणूक केली आहे.

Jugal Hansraj: ‘लकडी की काठी’चा तो चिमुकला चेहरा आठवतोय? ४३ वर्षांनी करतोय ‘या’ चित्रपटाच्या माध्यमातून कमबॅक

आलिया भट्ट (Alia Bhatt) : स्वतःच्या ब्रँडची मजबूत वाटचाल

आलिया भट्टने कमी वयातच व्यवसायाच्या जगात पाऊल ठेवले. लहान मुलांसाठी Ed-a-Mamma हा ब्रँड सुरू करून तिने चांगली ओळख निर्माण केली. या कंपनीतील ५१ टक्के हिस्सा Relianceने घेतल्याने या व्यवहाराची मोठी चर्चा झाली. याशिवाय Eternal Sunshine Productionsच्या माध्यमातून ती निर्मिती क्षेत्रातही सक्रिय आहे. फॅशन आणि पर्यावरणपूरक व्यवसायांमध्येही तिची गुंतवणूक आहे.

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी

स्टारडमच्या पुढे नवी ओळख

बॉलिवूडमधील या कलाकारांकडे पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते. आज प्रसिद्धी ही फक्त चित्रपटांच्या तिकिटांपुरती राहिलेली नाही. कलाकार आपल्या आवडी, अनुभव आणि कमाईचा वापर करून वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये उतरत आहेत. कोणी क्रिकेटमध्ये उतरले, कोणी फॅशनमध्ये तर कोणी तंत्रज्ञान आणि ब्युटीच्या क्षेत्रात आपली जागा निर्माण केली.

Web Title: Bollywood celebrities who built successful businesses and invested in startups

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • bollywod news
  • Bollywood Actress
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
1

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
2

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?
3

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?

Star Pravah Serial: सायलीच्या प्रयत्नांना अखेर यश! अर्जुन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला; ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो चर्चेत
4

Star Pravah Serial: सायलीच्या प्रयत्नांना अखेर यश! अर्जुन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला; ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.