Akshay kumar (फोटो सौजन्य-Instagram)
बॉलीवूड इंडस्ट्रीचा ॲक्शन स्टार अक्षय कुमार एप्रिलमध्ये रिलीज झालेल्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. परंतु आता अक्षय कुमारचा 2024 चा दुसरा चित्रपट ‘सरफिरा’ रिलीजसाठी सज्ज आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला असून, ‘सरफिरा’ या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार कमी किमतीची एअरलाइन सुरू करण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. ‘सरफिरा’ हा चित्रपट १२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
अक्षय कुमारने शेअर केला ‘सरफिरा’ चित्रपटाचा ट्रेलर
इंडस्ट्रीचा सुपरस्टार अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘सरफिरा’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. यासोबत अक्षय कुमारने लिहिले आहे की, ‘स्वप्न ती नसतात जी तुम्ही झोपेत पाहतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. सरफिरा ही अशाच एका स्वप्नाची कथा आहे. सरफिरा 12 तारखेला 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार (वीर म्हात्रे) एका गावातून येतो आणि स्वस्त विमानसेवा सुरू करण्याचा विचार करतो असे दाखवण्यात आले आहे. यानंतर तो इकडे-तिकडे भटकतो आणि लोकांना फक्त एक रुपयात विमानाने प्रवास करून देण्यासाठी धडपडताना करताना या चित्रपटामध्ये दिसणार आहे. अक्षय कुमारच्या ‘सरफिरा’ चित्रपटाच्या ट्रेलरला पसंती मिळत आहे आणि त्याचे चाहते चित्रपटगृहात हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
‘सरफिरा’ चित्रपटाची कथा
अक्षय कुमारचा चित्रपट ‘सरफिरा’ हा नॅशनल अवॉर्ड विजेत्या साऊथ चित्रपट सूरराई पोत्रूचा रिमेक आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधा कोंगारा यांनी केले असून मूळ चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनीच केले होते. अक्षय कुमारच्या ‘सरफिरा’ चित्रपटाची कथा कॅप्टन जीआर गोपीनाथ यांच्या जीवनावर आधारित आहे. कॅप्टन जीआर गोपीनाथ यांनी एअर डेक्कन विमानसेवा सुरू केली. ‘सरफिरा’ चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त राधिका मदन आणि परेश रावल सारखे स्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.