(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अभिनेत्री झरीन खानवर कोसळला दुःखाचा डोंगर; आईच्या निधनाने अभिनेत्री भावुक
अल्लू अर्जुनच्या घराबाहेर चाहत्यांवर लाठीचार्ज
‘पुष्पा’ स्टार अल्लू अर्जुन आज आपला ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. मंगळवारी रात्री चाहते मोठ्या संख्येने त्याच्या घरी जमले होते. अनेकांनी हा प्रसंग साजरा करण्यासाठी फटाकेही फोडले, तर काहींनी पूजा करून अभिनेत्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. परिणामी, हैदराबादच्या ज्युबिली भागातील अल्लू अर्जुनच्या घराबाहेर जमलेल्या गर्दीला नियंत्रणात ठेवणे अधिकाधिक कठीण झाले. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर झालेले चाहते अनियंत्रित झाले, त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. मात्र, थोड्याच वेळात अनियंत्रित चाहत्यांना नियंत्रणात आणण्यात आले.
तसेच असे घडण्याची ही पहिली वेळ नाही, ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी अल्लू अर्जुनला तुरुंगातही जावे लागले होते. आणि हे प्रकरण जास्त वाढले देखील होते.
दीपिका पादुकोणने Dhurandhar 2 चं का केलं नाही कौतुक? ट्रोलर्सना अभिनेत्रीने दिले सडेतोड प्रत्युत्तर
चाहत्यांना मिळाले सरप्राईज
८ एप्रिल रोजी, अल्लू अर्जुन त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक मोठी भेट भेटणार आहे. अभिनेत्याच्या आगामी ‘AA22xA6’ या चित्रपटाचे टायटल पोस्टर प्रदर्शित होणार आहे. जे पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ॲटली करत आहेत. या चित्रपटात हा दाक्षिणात्य स्टार बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबत दिसणार आहे.






