(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री झरीन खानवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिची आई बऱ्याच काळापासून आजाराशी झुंज देत होती. मात्र, आज अभिनेत्रीच्या आईने अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनाने झरीन खानला मोठा धक्का बसला असून, चाहते सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, झरीन खानने दोन दिवसांत एक नव्हे, तर दोन जवळच्या व्यक्तींना गमावले आहे. जवळच्या व्यक्तींना गमावल्यामुळे अभिनेत्री आणखी भावुक झाली आहे.
‘Dhurandhar The Revenge’ लीक प्रकरणात FIR दाखल; टेलिग्रामवर 50-50 रुपयांत विक्रीचा धक्कादायक प्रकार
झरीन खानने आईला गमावले
बॉलीवूड अभिनेत्री झरीन खानची आई, परवीन खान, यांचे ८ एप्रिल रोजी सकाळी निधन झाले. झरीन खानचा मॅनेजर, पियुष जैन यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना ही बातमी दिली. त्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “इन्ना लिल्लाही आणि इन्ना इलैही राजीऊन. तुम्हाला कळविण्यात येते की, आमच्या प्रिय मिस परवीन खान, झरीन खान आणि सना खान यांच्या आई, यांचे ८ एप्रिल रोजी निधन झाले आहे.” अंत्यविधी – सकाळी १०:०० वाजता, ८ एप्रिल, २०२६.” झरीन खान यांच्या आईचा अंत्यविधी अंधेरी येथील वर्सोवा मुस्लिम स्मशानभूमीत होणार आहे. ही बातमी कळताच चाहते आणि बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
दीपिका पादुकोणने Dhurandhar 2 चं का केलं नाही कौतुक? ट्रोलर्सना अभिनेत्रीने दिले सडेतोड प्रत्युत्तर
झरीन खानची अभिनय कारकीर्द
झरीन खानने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ‘फिर से रीस्टार्ट’ या लघुपटातून केली. त्यानंतर तिने २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘वीर’ या चित्रपटातून सलमान खानसोबत मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. या चित्रपटानंतर ती आणखी मोठ्या चित्रपटांमध्ये दिसेल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. त्यानंतर झरीन खानने बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले. दरम्यान, ती ‘हाऊसफुल २’, ‘अक्सर २’ आणि ‘हेट स्टोरी ३’ यांसारख्या बॉलीवूड चित्रपटांमध्येही दिसली. झरीन खान शेवटची २०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘हम भी अकेले तुम भी अकेले’ या चित्रपटात देखील दिसली होती.






