(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मॅडॉकच्या हॉरर युनिव्हर्सच्या पुढील चित्रपट ‘थामा’ मधून आयुष्मान खुरानासह चित्रपटाच्या संपूर्ण कलाकारांचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यासोबतच, कोणत्या भूमिकेत कोण दिसणार याची माहितीही निर्मात्यांनी दिली आहे. फर्स्ट लूकनंतर चित्रपटाबद्दल लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. संपूर्ण स्टारकास्टची झलक पाहून चाहते चकीत झाले आहेत. आता चित्रपटाची कथा, कलाकारांच्या भूमिका जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहे. हा चित्रपट आता लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
आयुष्मान बनतो मानवतेची शेवटची आशा
निर्मात्यांनी चित्रपटातील आयुष्मान खुराना, रश्मिका मंदान्ना, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल यांचे लूक रिलीज केले आहेत. चित्रपटात आयुष्मान खुराना मानवतेची शेवटची आशा असलेल्या आलोकच्या भूमिकेत दिसणार आहे. रिलीज झालेल्या पहिल्या लूकमध्ये आयुष्मान अंधारात उभा राहून एक तीव्र लूक देताना दिसत आहे. त्याचा लूक आणि त्याच्या नजरेने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष
रश्मिका ही प्रकाशाची पहिली किरण
चित्रपटातील रश्मिका मंदानाचा लूक देखील निर्मात्यांनी रिलीज केला आहे. तिच्या पात्राचे नाव तारका आहे, जी प्रकाशाची पहिली किरण आहे. या लूकमध्ये रश्मिका रागावलेली दिसत आहे. ती एका जंगलात उभी आहे आणि तिचे केस विस्कटलेले आहेत. हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये रश्मिका खूपच आकर्षित दिसत आहे. रश्मिकाच्या पोस्टरने देखील चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी अंधाराचा राजा
अक्षय कुमारनंतर नवाजुद्दीन सिद्दीकीनेही भयपट विश्वात प्रवेश केला आहे. नवाज ‘थामा’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या पात्राचे नाव यक्षन आहे, जो अंधाराचा राजा आहे. पोस्टरमध्ये नवाज भयानक हास्य करत आहे. त्याच्या मागे एका महाकाय पुतळ्याचा चेहरा दिसतो आहे, ज्याचे दोन मोठे दात आहेत आणि तिच्या डोळ्यात आग जळत आहे. तसेच, काली देवीची किंवा राक्षसांची देवीची मूर्ती देखील दिसत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी यांना एक नवीन भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
हरनाज संधू आणि टायगरच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन, ‘Baaghi 4’ मधील पहिलं गाणं रिलीज!
परेश रावल राम बजाज गोयल यांच्या भूमिकेत
परेश रावल हे राम बजाज गोयल यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात परेश रावल देखील एका प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ते चित्रपटात राम बजाज गोयल यांची भूमिका साकारत आहेत, ज्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना विनोदातही नेहमीच त्रासदायकता आढळते. चष्मा आणि स्वेटर घातलेले परेश रावल पोस्टरमध्ये चिंताग्रस्त दिसत आहेत. अभिनेत्याचे पोस्टर अर्धे काळे आणि अर्धे लाल आहे.
‘थामा’च्या जगाची पहिली झलक उद्या होणार रिलीज
चित्रपटातील मुख्य कलाकारांचा पहिला लूक प्रदर्शित करण्यासोबतच, निर्मात्यांनी अशीही माहिती दिली आहे की ‘थामा’च्या जगाची पहिली झलक उद्या म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘थामा’ हा चित्रपट यावर्षी दिवाळीत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आता चाहत्यांच्या मनात वाढतच चाली आहे.