(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. आधी ‘बॅटल ऑफ गलवान’ या नावाने चर्चेत असलेला हा चित्रपट आता नव्या टायटलसह प्रेक्षकांसमोर येणार असल्याची माहिती मिळत आहे.
हा चित्रपट Galwan Valley clashया ऐतिहासिक घटनेवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाचे नाव बदलण्यामागे काही रणनीतिक आणि क्रिएटिव्ह कारणे असल्याची चर्चा आहे.
आता हा चित्रपट ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या नावाने प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचा एक दमदार नवीन पोस्टरही शेअर केला आहे, ज्यातून केवळ नावातील बदलच नाही तर आजच्या जगासाठी अत्यंत महत्त्वाचा संदेशही देण्यात आला आहे.
दिलजीत दोसांझच्या ‘Dil-Luminati’ टूरची जबरदस्त कमाई, 943 कोटींचा व्यवसाय, 1.18 लाख लोकांना रोजगार!
या नव्या शीर्षकातील सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याची टॅगलाइन — “मे वॉर रेस्ट इन पीस” .या विचारातून सलमान खानने एक मोठा आणि अर्थपूर्ण संदेश दिला आहे. हा संदेश फक्त युद्ध किंवा संघर्षापुरता मर्यादित नसून, संपूर्ण जगात शांततेची आशा व्यक्त करणारा आहे.
हा चित्रपट गलवान वॅली मधील ऐतिहासिक घटनेपासून प्रेरित असला तरी, त्याच्या नावामागील संदेश रणभूमीच्या सीमांपलीकडे जाऊन मानवतेसाठी शांततेचा विचार मांडतो.
‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान एक प्रभावी विचार प्रेक्षकांसमोर मांडत आहेत, जो लोकांच्या मनाला भिडत आहे. या घोषणेनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली असून, चित्रपटाच्या नावामागील ताकदवान भावना आणि या धाडसी निर्णयाचे अनेक जण कौतुक करत आहेत.
“बॅटल ऑफ गलवान” हा चित्रपट १७ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सलमान खानने नाव बदलण्याबाबत शेअर केलेल्या पोस्टमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेचा उल्लेख नाही. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये किंवा कॅप्शनमध्ये १७ एप्रिल किंवा इतर कोणत्याही प्रदर्शन तारखेचा उल्लेख नाही. यामुळे प्रश्न उपस्थित होतो: चित्रपटाची प्रदर्शन तारीख पुढे ढकलण्यात आली आहे का?






