Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भूत बंगला’ पोस्टपोन होताच Akshay Kumar ने ॲक्शन चित्रपटांवर साधला निशाणा; म्हणाला “सगळं फेक वाटतंय…”

अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'चे प्रदर्शन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले असून, प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, अक्षय कुमारने अलीकडेच ॲक्शन चित्रपटांच्या सध्याच्या ट्रेंडवर भाष्य केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 29, 2026 | 10:08 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘भूत बंगला’ पोस्टपोन होताच अक्षय कुमारचा संताप
  • ‘भूत बंगला’ कधी होणार प्रदर्शित?
  • अक्षय कुमारचे आगामी चित्रपट
 

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘भूत बंगला’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षयचा बहुप्रतिक्षित चित्रपट, जो १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, तो पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. ‘भूत बंगला’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असतानाच, अभिनेत्याने ॲक्शन चित्रपटांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, अक्षय कुमारने आजकाल चित्रपटांमध्ये ॲक्शन ज्या प्रकारे दाखवली जात आहे, त्यावर टीका केली आहे. सध्या ॲक्शन बहुतांशी स्क्रीन आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तयार केली जात असल्याबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली आहे.

पीटीआयला दिलेल्या एका अलीकडील मुलाखतीत अक्षय कुमारने स्पष्ट केले की, पूर्वीच्या चित्रपटांमधील ॲक्शन खूप वास्तववादी वाटायची. मात्र, आजकाल बहुतेक चित्रपट ॲक्शनसाठी तंत्रज्ञानावर अवलंबून असतात, ज्यामुळे ती कमी वास्तववादी वाटते. ॲक्शन चित्रपटांबद्दल अक्षय कुमारला आणखी काय म्हणाला जाणून घेऊयात.

Dhurandhar 2 Collection: रणवीर सिंगच्या चित्रपटाने ओलांडला 1200 कोटींचा टप्पा; 10 दिवसात उडवली खळबळ

अक्षय कुमार ॲक्शन चित्रपटांबद्दल म्हणाला, “आजकाल ॲक्शन चित्रपट बनवण्याच्या पद्धतीत खूप मोठा फरक पडला आहे. पूर्वी ॲक्शन खरी असायची, पण आता सगळं काही VFX ने केलं जातं. त्यात मजा येत नाही कारण ते बनावट दिसतात. मला असा चित्रपट बनवायचा आहे जो खरा वाटेल. उदाहरणार्थ, जर मी उडी मारत असेन, तर मी खरोखरच उडी मारत असेन, VFX चा तिथे वापर नसेल. किंवा जर मी लाथ मारत असेन, तर मी खरोखरच लाथ मारत असेन, १५ लोक मला लाथ मारायला मदत करत नसत. मला VFX शिवाय ॲक्शन चित्रपट बनवायचा आहे.”

अक्षयला कोणत्या प्रकारचा ॲक्शन चित्रपट बनवायचा आहे?

चित्रपट निर्मितीमध्ये एआयच्या (AI) वाढत्या वापराबाबत आपल्याला काही शंका असल्याचेही अभिनेत्याने स्पष्ट केले. तो म्हणाला, “मी हे एआयच्या युगात सांगत आहे, आणि लोकांना जे वाटेल ते वाटू द्या, पण मला एक असा ॲक्शन चित्रपट बनवायचा आहे जो खरा ॲक्शन चित्रपट असेल. प्रेक्षकांना त्यामागे घेतलेली मेहनत जाणवेल – एआय किंवा कॉम्प्युटरने केलेल्या मेहनतीसारखी नाही.”

शेतमजुराचा मुलगा चमकला चंदेरी दुनियेत! ‘सुपर डुपर’ मधील अंशुमन मोरेच्या ‘कुकडू कू’ गाण्याने जिंकली रसिकांची मनं

अक्षय कुमारचे आगामी चित्रपट

कामाच्या आघाडीवर, अक्षय कुमार सध्या प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भूत बंगला’ या चित्रपटात दिसणार आहे. या हॉरर कॉमेडीमध्ये परेश रावल, तब्बू आणि वामिका गब्बी हे कलाकारही आहेत. हा चित्रपट मूळतः १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, पण आता तो १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त, अक्षय कुमार ‘गोलमाल ५’ मध्येही दिसणार आहे, जो पुढील वर्षी २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Bhooth bangla gets new release date here akshay kumar slams action movies vfx and ai use nowadays

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 10:08 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Sunita Ahuja: ‘वो जिसके साथ..’; गोविंदांच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर सुनीता आहूजांनी सोडलं मौन, ‘त्या’ पोस्टनंतर बदलला सूर?
1

Sunita Ahuja: ‘वो जिसके साथ..’; गोविंदांच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर सुनीता आहूजांनी सोडलं मौन, ‘त्या’ पोस्टनंतर बदलला सूर?

Pooja Birari Pink Saree Look: पिंक साडीत पूजा बिरारीचा घायाळ करणारा मराठमोळा लुक! सोन्याच्या दागिन्यांनी लावला चारचाँद
2

Pooja Birari Pink Saree Look: पिंक साडीत पूजा बिरारीचा घायाळ करणारा मराठमोळा लुक! सोन्याच्या दागिन्यांनी लावला चारचाँद

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट
3

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट

Chhaya Kadam Bhootam Bhayyam: छाया कदमांचा ‘भूतम भयम्’चा अनुभव; ‘जठाई’च्या व्यक्तिरेखेबाबत अभिनेत्रीने सांगितली मनातली गोष्ट
4

Chhaya Kadam Bhootam Bhayyam: छाया कदमांचा ‘भूतम भयम्’चा अनुभव; ‘जठाई’च्या व्यक्तिरेखेबाबत अभिनेत्रीने सांगितली मनातली गोष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.