Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वयंभू’ मेकर्सची मोठी घोषणा! निखिल सिद्धार्थची पॅन इंडिया फिल्म ‘या’ दिवशी थिएटर्समध्ये होणार रिलीज!

या चित्रपटाचे शूटिंग तब्बल 170 दिवस चाललं असून ती पिक्सल स्टुडिओजचे भूवन आणि श्रीकर यांनी निर्मित केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 25, 2025 | 05:55 PM
(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील काही उत्कृष्ट तंत्रज्ञ आणि कलाकार मिळून ‘स्वयंभू’हा भव्य चित्रपट तयार करत आहेत. यात दिग्दर्शक भरत कृष्णमाचारी, KGF आणि सालारचे म्युझिक डायरेक्टर रवि बसरूर, बाहुबली आणि RRRचे सिनेमॅटोग्राफर के.के. सेंथिल कुमार, तसेच बाहुबलीचे एडिटर तम्मिराजू यांच्यासारखे मोठे नावं आहेत. या चित्रपटाचे शूटिंग तब्बल 170 दिवस चाललं असून ती पिक्सल स्टुडिओजचे भूवन आणि श्रीकर यांनी निर्मित केली आहे.

आजच्या दिवसातील सर्वात मोठ्या घोषणेची वेळ आली आहे. कारण कार्तिकेय फ्रेंचाइजच्या यशामागील चेहरा असलेले निखिल सिद्धार्थ आता एका पूर्णपणे वेगळ्या अंदाजातील ऐतिहासिक महागाथा स्वयंभू घेऊन परतत आहेत. रॅप-अप व्हिडिओद्वारे केलेला हा फिल्म अनाउंसमेंट हा खरोखरच अनोखा आणि भव्य पद्धतीने प्रोजेक्ट सादर करण्याचा मार्ग आहे. यात चित्रपटाची विशालता, दमदार अ‍ॅक्शन, उत्कृष्ट स्टार कास्ट आणि एका सामान्य माणसाची योद्धा बनण्याची महागाथा यांची झलक पाहायला मिळते.

कार्तिकेय 2 या पॅन-इंडिया सुपरहिटनंतर संपूर्ण देशभरात लोकप्रिय झालेल्या निखिलची ही 20 वी फिल्म असून, स्वयंभू ही त्यांची सर्वांत महत्त्वाकांक्षी फिल्म मानली जात आहे. मोठ्या स्केलवर बनणारी ही ऐतिहासिक अ‍ॅक्शन फिल्म भरत कृष्णमाचारी दिग्दर्शित करत आहेत. निर्मिती पिक्सल स्टुडिओज अंतर्गत भूवन आणि श्रीकर यांनी केली असून, टॅगोर मधू हे या प्रोजेक्टचे प्रस्तुतकर्ता आहेत. उच्च प्रोडक्शन व्हॅल्यू आणि दमदार पॅन-इंडिया व्हिजनमुळे स्वयंभू निखिलच्या सर्वात खास चित्रपटांपैकी एक ठरणार आहे.

आज मेकर्सने मोठा अपडेट शेअर करत सांगितले की या भव्य चित्रपटाचे शूटिंग अधिकृतरीत्या पूर्ण झाले आहे. दोन वर्षांच्या मेहनतीनंतर आणि 170 दिवसांच्या लांब शूटिंगनंतर टीमने अभिमानाने या समाप्तीची घोषणा केली. भारताच्या समृद्ध इतिहासाला आणि त्याच्या सांस्कृतिक वारशाला सलाम करणारा हा चित्रपट स्वयंभू महा शिवरात्री13 फेब्रुवारी 2026 रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘राईझ ऑफ स्वयंभू’ या रिलीज डेट अनाउंसमेंट व्हिडिओमध्ये निखिलने या प्रवासाबद्दल बोलताना हे संपूर्ण अनुभव आव्हानात्मक आणि रोमांचक असल्याचे सांगितले. फिल्मची विशाल दुनिया तयार करण्यासाठी मोठमोठ्या एकरांमध्ये सेट्स उभारण्यात आले. कोट्यवधींच्या बजेटसह, निर्माता भूवन आणि श्रीकर यांच्या संपूर्ण पाठिंब्याने टीम एकाच उद्दिष्टाने पुढे जात होती.ही अनोखी कथा मोठ्या पडद्यावर भव्य स्वरूपात सादर करण्याचे.


मिस युनिव्हर्स २०२५ वादाच्या भोवऱ्यात; अंतिम फेरीत पोहोचलेल्या ऑलिव्हियाने किताब केला परत

भारताच्या सांस्कृतिक वारशाशी जोडलेली स्वयंभू ही अशी अनकथित कथा आहे, जी फक्त राजा-महाराजे किंवा युद्धांच्या नेहमीच्या कथांपेक्षा खूपच पुढे जाते. याच्या मध्यभागी एक अशा प्रचंड योद्ध्याची गाथा आहे, ज्याची शौर्यगाथा संपूर्ण काळाला बदलून गेली.

व्हिडिओमध्ये निखिल आपल्या घोड्याला, मारुतीला देखील दाखवतात आणि या भव्य चित्रपटामागील अद्भुत टीमची ओळख करून देतात. हा आव्हानात्मक रोल वास्तववादी पद्धतीने साकारण्यासाठी निखिलने आपल्या शरीरात मोठा बदल केला तसेच कडक प्रशिक्षणही घेतले. हिंदी व्हर्जनमध्ये त्यांनी स्वतःचा आवाजही दिला, ज्यामुळे कथा अधिक प्रभावी आणि खरीखुरी वाटेल.

सेलिना जेटलीनीचे पतीवर गंभीर आरोप, ५० कोटी रुपयांच्या मागणीसह मागितला घटस्फोट

आता या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यामुळे स्वयंभूचा प्रवास अधिकृतरीत्या सुरू झाला आहे, आणि पॅन-इंडिया चित्रपट म्हणून प्रेक्षकांमध्ये याबद्दलची उत्सुकता झपाट्याने वाढत आहे.

Web Title: Big announcement from the makers of swayambhu nikhil siddharthas pan india film to hit theatres

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 05:55 PM

Topics:  

  • bollywod news
  • bollywood movies
  • Entertainement News

संबंधित बातम्या

‘Dhurandhar’ने जिंकली मनं, ‘FA9LA’चा गायक फ्लिपराची करणार भारत दौरा; ‘या’ शहरात करणार पहिला शो
1

‘Dhurandhar’ने जिंकली मनं, ‘FA9LA’चा गायक फ्लिपराची करणार भारत दौरा; ‘या’ शहरात करणार पहिला शो

तान्हाजी चित्रपटाचा ६ वर्षांनी दुसरा भाग येणार? अजय देवगणच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण
2

तान्हाजी चित्रपटाचा ६ वर्षांनी दुसरा भाग येणार? अजय देवगणच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

Mardaani 3 Release Date: हातात बंदूक आणि निर्भिड चेहरा घेऊन पुन्हा येणार शिवानी शिवाजी रॉय,  ‘मर्दानी ३’चा पहिला लूक रिलीज
3

Mardaani 3 Release Date: हातात बंदूक आणि निर्भिड चेहरा घेऊन पुन्हा येणार शिवानी शिवाजी रॉय, ‘मर्दानी ३’चा पहिला लूक रिलीज

Birthday Special: फरहान अख्तरच्या वाढदिवसानिमित्त ‘120 बहादूर’कडे विशेष लक्ष; आशय, प्रामाणिकपणा आणि ठामपणाचा ठसा
4

Birthday Special: फरहान अख्तरच्या वाढदिवसानिमित्त ‘120 बहादूर’कडे विशेष लक्ष; आशय, प्रामाणिकपणा आणि ठामपणाचा ठसा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.