Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“साहेब परत या, महाराष्ट्राला…” – Prasad Oakने लावला आनंद दिघेंना कल्पनेचा फोन, ऐकून अंगावर काटा आला

Prasad Oak मराठी अभिनेता प्रसाद ओक याने रत्नागिरीतील एका कार्यक्रमात आनंद दिघे साहेबांना काल्पनिक फोन लावून आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘धर्मवीर’ आणि ‘धर्मवीर 2’ या चित्रपटांमध्ये आनंद दिघे यांची भूमिका साकारताना त्यांना दिघे साहेबांचे शिष्य आणि कार्यकर्त्यांकडून अनेक आठवणी व किस्से ऐकायला मिळाल्याचे त्याने सांगितले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 18, 2026 | 05:26 PM
Prasad Oak (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Prasad Oak (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी सिनेमाचा लाडका अभिनेता प्रसाद ओकने ‘धर्मवीर‘ आणि ‘धर्मवीर 2’ या दोन्ही सिनेमात आनंद दिघे साहेबांची अक्षरशः जिवंत भूमिका केली आहे. हा सिनेमा लोकांना एवढा आवडला की थिएटर हाऊसफुल्ल झाले. प्रसादला या भूमिकेसाठी अनेक पुरस्कार पण मिळाले. लोक अजूनही त्याला दिघे साहेब म्हणूनच ओळखतात. Prasad Oak

आता रत्नागिरीत एका कार्यक्रमात प्रसाद ओकने जे केले, त्याने सगळ्यांचे डोळे पाणावले. त्याने स्टेजवरून आनंद दिघे साहेबांना काल्पनिक फोन लावला आणि मनातले सगळे बोलून दाखवले.

प्रसाद काय म्हणाला?

प्रसाद स्टेजवर भावूक झाला होता. तो म्हणाला, “दिघे साहेब, जय महाराष्ट्र. माझे दुर्दैव आहे की मी तुम्हाला कधीच प्रत्यक्ष पाहिले नाही. कधी भेटलो नाही. तुमचा सहवास मला कधीच मिळाला नाही.”तो पुढे म्हणाला, “मी आयुष्यात दोन वेळा तुमचे नाव ऐकले होते आणि तेव्हाच तुमचे नाव किती मोठे आहे हे कळले.

Sachin Pilgaonkar: लक्ष्मीकांत बेर्डेंचा तो भावूक निरोप! सचिन पिळगांवकरांनी सांगितला ‘नवरा माझा नवसाचा’शी संबंधित किस्सा

ही गोष्ट माझ्या मनाला खूप भावली

पहिला प्रसंग म्हणजे नथुराम गोडसे हे नाटक बंद पडले होते, ते तुम्ही सुरू करून दिले. आणि दुसरा प्रसंग यदा कदाचित हे नाटक बंद झाले होते, ते पण तुम्हीच सुरू केले. तेव्हा मला कळले की जेव्हा कलेचा प्रश्न येतो, तेव्हा तुम्ही पक्ष, राजकारण सगळे बाजूला ठेवून कलाकाराच्या मागे खंबीरपणे उभे राहता. ही गोष्ट माझ्या मनाला खूप भावली होती.

“प्रसाद म्हणाला की, मी स्वप्नात सुद्धा विचारा केला नव्हता की, मी तुमची भूमिका साकारेन. पण जेव्हा मला ती भूमिका मिळाली, तेव्हा तुमचे शिष्य, तुमचे कार्यकर्ते मला खूप मदत करायला आले. मी दिघे साहेबांची भूमिका करतोय हे कळल्यावर नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक अशा लांब लांब ठिकाणांहून लोक मला भेटायला यायचे. तुमच्या बद्दलच्या आठवणी सांगायचे, किस्से सांगायचे. त्याचाच मला सिनेमात खूप उपयोग झाला.

Ramayana Movie: ‘रामायण: राइज ऑफ अ लिजेंड’चा हॉलीवूडमध्ये डंका! ९४५ पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगणार भव्य वर्ल्ड प्रीमियर

“तुम्ही असता तर महाराष्ट्राची ही अवस्था नसती”

शेवटी प्रसाद अगदी भावूक होऊन म्हणाला, “आज धर्मवीर 1 आणि धर्मवीर 2 या दोन्ही सिनेमांना जे यश मिळाले, माझ्या कामाचे कौतुक झाले, ते फक्त तुमच्या आशीर्वादामुळेच आहे. दीघे साहेब तुम्ही आमच्याजवळ आहात म्हणून मी हे करु शकलो. पण या सगळ्यापलीकडे जाऊन एकच सांगतो साहेब, आज महाराष्ट्रात जी परिस्थिती चालू आहे, ती तुम्ही असता तर 100 टक्के नसती. तुम्ही परत आलात तरच महाराष्ट्र वाचेल. प्लीज परत या.”

Ramayana Movie: ‘रामायण: राइज ऑफ अ लिजेंड’चा हॉलीवूडमध्ये डंका! ९४५ पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगणार भव्य वर्ल्ड प्रीमियर

प्रसादचे हे शब्द ऐकून तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या अंगावर काटा आला. अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. त्याचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लोक म्हणत आहेत की दिघे साहेबांची भूमिका करण्यासाठी प्रसाद ओक शिवाय दुसरा कोणी असूच शकत नाही.

Web Title: Prasad oak emotional speech anand dighe ratnagiri viral video rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • prasad oak

संबंधित बातम्या

Nagpur News :भाजप नेत्यांचा १०० कोटींचा गरबा ;दुष्काळावरून लोंढे यांचा सरकारवर हल्लाबोल
1

Nagpur News :भाजप नेत्यांचा १०० कोटींचा गरबा ;दुष्काळावरून लोंढे यांचा सरकारवर हल्लाबोल

Diwali Bonus 2025-26: दिवाळीआधी कर्मचाऱ्यांची बल्ले-बल्ले! थेट 13,816 रुपयांचा बोनस, कोणाला होणार फायदा?
2

Diwali Bonus 2025-26: दिवाळीआधी कर्मचाऱ्यांची बल्ले-बल्ले! थेट 13,816 रुपयांचा बोनस, कोणाला होणार फायदा?

Nagpur News : धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर सज्ज ;पाच दिवस वाहतुकीचे विशेष नियोजन
3

Nagpur News : धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर सज्ज ;पाच दिवस वाहतुकीचे विशेष नियोजन

Chandrapur News: गावाची तहान भागवणाऱ्या योजनेलाच चोरट्यांचा फटका! काजळसर गावाच्या पाणीपुरवठा योजनेतील व्हॉल्व्ह चोरीला
4

Chandrapur News: गावाची तहान भागवणाऱ्या योजनेलाच चोरट्यांचा फटका! काजळसर गावाच्या पाणीपुरवठा योजनेतील व्हॉल्व्ह चोरीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.