फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 : बिग बॉस 18 चा शेवटचा वीकेंड एपिसोड खूपच मजेशीर होता. वीकेंड का वार मध्ये, एकीकडे सलमान खानने त्याला जोरदार फटकारले, तर दुसरीकडे त्याने अशी कामे केली ज्यामुळे संपूर्ण घराचे वातावरण हलके झाले. प्रेक्षकांनीही हे टास्क पाहण्याचा आनंद लुटला. आता आगामी भागामध्ये नॉमिनेशन होणार आहेत. त्यानंतर आता विवियन डिसेना आणि चुम दारंग एकमेकांवर प्रश्नाचा मारा करताना दिसणार आहेत.
सोशल मीडियावर सध्या एक प्रोमो प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये चुम दारंग आणि विवियन डीसेना हे एकमेकांना प्रश्न करताना दिसणार आहेत. प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये विवियन डिसेना किचनमध्ये येतो आणि चुम दारंगला प्रश्न करतो की तुझ्या मते कोण आहेत टॉप स्पर्धक. यावर चुम दारंग म्हणते की, माझ्या मते सर्वात पहिल्या स्थानावर करण आहे. यावर विवियन म्हणतो की, बघ चुम कोणाच्या वर असणं किंवा खाली असणं यावरून व्यक्तीची क्षमता आपण नाही सांगू शकत. जर करण तिसऱ्या स्थानावर असेल तर मी चौथ्या स्थानावर आहे आणि जर करण पहिल्या स्थानावर आहे तर मी दुसऱ्या स्थानावर आहे.
यावर विवियन डिसेना म्हणतो की, जर तुझ्या घरच्या प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर करण कोणत्या स्थानावर आहे यावरून मोजावी लागणार आहे. म्हणजेच तुझ्या प्रवास मोजायचा पॅरामीटर करण आहे? यावर चुम म्हणते की, असे अजिबात नाही आहे. यावर उभे अभिनेता म्हणतो की, एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे एखाद्या त्याच्या वैयत्तिक जीवनावर असायला हवं की ते दुसऱ्यांवर अवलंबून असायला हवे. म्हणजेच तुझी काही स्वतःच व्यक्तिमत्व नाही आहे? तू तुला नंबर ४ ला ठेवत आहेस घरातल्या योगदानाच्या पॅरामीटरवर. काय योगदान दिल आहेस तू? यावर चुम म्हणते की, तू काय योगदान दिल आहेस ते सांग? मी तुला माझी आकडेवारी सांगितली तूला मी आता प्रश्न केला आहे तू तुझं सांग आता. यावर विवियन म्हणतो की, मला माझं योगदान माहिती आहे काय आहे ते.
Promo #BiggBoss18#VivianDsena Vs #ChumDarang pic.twitter.com/t8rJXm0XM8
— The Khabri (@TheKhabriTweets) December 23, 2024
पुढे चुम म्हणते की, मला सुद्धा माझं माहिती आहे आणि तुझंही माहिती आहे. पुढे विवियन म्हणतो की, जर तू म्हणतेस की माझं या घरामध्ये योगदान आहे आणि जेवण बनवणं आणि जेवण वाटून देणं हे जर योगदान आहे तर हे योगदान नाही. यावर चुमला राग येतो आणि ती विवियनला म्हणते की, मग तुझं तर कॉफी बनवणं आणि एकाच गटामध्ये बसून राहणं हे तुझं योगदान आहे का? यावर विवियन म्हणतो की, घरातल्या मुद्द्यांवर बोलणं हे योगदान आहे आणि मी बऱ्याच मुद्द्यांवर बोललो आहे. यावर चुम म्हणते की, तू जेव्हढं करत आहेस तेवढं मी सुद्धा करत आहे, कदाचित मी तुझ्याहून जास्तच करत आहे.