Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bobby Deol Bday: बॉबी देओलने चाहत्यांसोबत खास अंदाजात साजरा केला वाढदिवस, ‘आश्रम’ मालिकेसाठी अभिनेता उत्सुक!

एकीकडे, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियाद्वारे बॉबी देओलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. आणि त्याच्या चाहत्यांनी अभिनेत्यासाठी एका वेगळ्या प्रकारच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची योजना आखली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 27, 2025 | 04:59 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात बॉबी देओलने अबरारची भूमिका साकारल्यापासून त्याच्या चाहत्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. २७ जानेवारी रोजी अभिनेत्याचे काही चाहते त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घराबाहेर आले होते. तसेच अभिनेत्याने स्वतःचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला आला. बॉबी देओल देखील त्याच्या चाहत्यांना मोठ्या प्रेमाने भेटताना दिसला आहे. चाहते त्याला पाहून खूप आनंदी दिसत आहेत. तसेच अभिनेत्याला अनेक चाहत्यांसह कलाकारांच्याही शुभेच्छा येत आहेत.

King: ‘किंग’ चित्रपटाचे दिग्दर्शन सांभाळणार सिद्धार्थ आनंद; शाहरुख खानने सोडले मौन, केला खुलासा!

चाहते केक आणि मोठा लाडू घेऊन आले
बॉबी देओलचे अनेक चाहते त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या घराबाहेर जमले होते. घराबाहेर चाहत्यांनी अभिनेत्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे गाणे गायले. तसेच, काही चाहते बॉबी देओलसाठी एक मोठा केक आणि एक मोठा लाडू घेऊन आले होते. या अभिनेत्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसमोर केक आणि लाडू कट केला. यावेळी तो खूप आनंदी दिसत होता. तसेच अभिनेत्यासह त्याच चाहते देखील खूप खुश दिसत होते.

अभिनेत्याने चाहत्यांचे आभार मानले
केक कापल्यानंतर, बॉबी देओलने चाहत्यांचे इतके प्रेम दिल्याबद्दल आभार मानले. तसेच, चाहत्यांच्या आणि पापाराझींच्या विनंतीनुसार, बॉबी देओलने ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील एक सिग्नेचर सीन देखील सादर केला. जेव्हा बॉबीने चित्रपटातील दृश्य पुन्हा तयार केले तेव्हा चाहत्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. चाहत्यांना त्याला अभिनय करताना पाहून खूप आनंद झाला.

‘औरंगजेब’ च्या अवतारात दहशत निर्माण करणार बॉबी देओल; वाढदिवसानिमित्त ‘हरी हर वीरा मल्लू’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज!

आश्रम मालिकेबाबत अपडेट दिले
अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त बॉबी देओलने चाहत्यांना सांगितले की तो त्याच्या ‘आश्रम’ या वेब सिरीजच्या पुढील सीझनची वाट पाहत आहे. तो या मालिकेतील ‘जपनम’ हा संवाद बोलतानाही दिसला. या मालिकेत, बॉबीचे पात्र त्याच्या भक्तांना लाडू खाऊ घालून नियंत्रित करायचे. म्हणूनच चाहत्यांनी बॉबी देओलसाठी एक मोठा लाडू बनवला आणि त्याच्या वाढदिवशी अभिनेत्याची आणला.

Web Title: Bobby deol birthday celebration with fans outside his home excited for series aashram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 04:59 PM

Topics:  

  • Bobby Deol
  • entertainment

संबंधित बातम्या

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू
1

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.