(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
पवन कल्याण अभिनीत ‘हरी हर वीरा मल्लू’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज २७ जानेवारी रोजी बॉबी देओलच्या ५६ व्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी त्याच्या वाढदिवसाचे खास पोस्टर रिलीज केले गेले आहे. या चित्रपटात अभिनेता बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अखेर, अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या या खास दिवशी, या चित्रपटामधील त्याची पहिली झलक प्रदर्शित झाली आहे, ज्यामध्ये बॉबी एका दमदार लूकमध्ये दिसत आहे. चाहत्यांना त्याचा लुक खूपच आवडला आहे. शुभेच्छासह अभिनेत्याच्या लूकचे चाहते कौतुक देखील करत आहेत.
राज ठाकरेंच्या भेटीनंतर लक्ष्मण उतेकरांनी घेतला महत्वाचा निर्णय, ‘छावा’तील तो सीन डिलीट करणार!
निर्मात्यांनी शेअर केले पोस्टर
‘हरी हर वीरा मल्लू’ चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये बॉबी देओल एका सम्राटाच्या रूपात एका तीव्र आणि शाही लूकमध्ये दिसणार आहे, ज्यामुळे चाहत्यांना पवन कल्याणच्या बहुप्रतिक्षित पीरियड ड्रामामधील त्याच्या भूमिकेची झलक पाहायला मिळते आहे. ‘एक्स’ वरील पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “टीम हरी हर वीरा मल्लू, कडून स्क्रीनवर उपस्थिती असलेल्या बॉबी देओलला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.” असे लिहून निर्मात्यांनी चित्रपटामधील अभिनेत्याचा लुक प्रदर्शित केला आहे.
Wishing the incomparable, the man of magnetic screen presence @thedeol a very Happy Birthday! – Team #HariHaraVeeraMallu ⚔️#HBDBobbyDeol 🔥
Power star 🌟 @PawanKalyan @AMRathnamOfl @AnupamPKher @AgerwalNidhhi @amjothikrishna @mmkeeravaani @ADayakarRao2 @Manojdft… pic.twitter.com/frklEumhjM
— Hari Hara Veera Mallu (@HHVMFilm) January 27, 2025
बॉबी देओल औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे.
पोस्टरमध्ये बॉबी देओल एका आकर्षक काळ्या पोशाखात, तलवार धरलेला दिसत आहे. जो त्याच्या व्यक्तिरेखेतील क्रूरतेचे उत्तम प्रकारे चित्रण करतो. मिळालेल्या माहितीनुसार, तो या चित्रपटात मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. बॉबी देओलने अलीकडेच ‘डाकू महाराज’ या तेलुगू चित्रपटातून पदार्पण केले ज्यामध्ये त्याने नंदमुरी बालकृष्ण, उर्वशी रौतेला आणि प्रज्ञा जयस्वाल यांच्यासोबत काम केले आहे. तसेच बॉबी कोली दिग्दर्शित या चित्रपटात देओलने एक प्रभावी भूमिका साकारली होती. आता, तो पवन कल्याणसोबत ‘हरि हर वीरा मल्लू’ मध्ये औरंगजेबाच्या भूमिकेत स्क्रीन शेअर करण्यास सज्ज झाला आहे.
या दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
दरम्यान, हरि हर वीरा मल्लूचे पहिले गाणे ‘माता विनाली’ आधीच हिट झाले आहे. पवन कल्याण यांनी गायलेले आणि ऑस्कर विजेते संगीतकार एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे लोकांना खूप आवडले. क्रिश जगरलामुडी दिग्दर्शित हा चित्रपट १७ व्या शतकात घडतो आणि अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्या एका डाकूची कहाणी मांडणारा आहे. यात पवन कल्याण, बॉबी देओल, निधी अग्रवाल, नर्गिस फाखरी आणि नोरा फतेही यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विजय दोंकडा निर्मित, हरि हर वीरा मल्लू २८ मार्च २०२५ रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहे.