फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘किंग’ सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करणार आहे. दोन वर्षांनंतर दोघेही पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहेत. यापूर्वी शाहरुख खान आणि सिद्धार्थ यांनी २०२३ मध्ये आलेल्या ‘पठाण’ चित्रपटात एकत्र काम केले होते. आधी असे म्हटले जात होते की सुजॉय घोष हे किंग या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होत. परंतु आता या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार असल्याचे समोर आले आहे. ही सगळी माहिती स्वतः शाहरुख खानने दिली आहे.
शाहरुख खानने स्वतः अपडेट शेअर केले
रविवारी दुबईतील ग्लोबल व्हिलेज कार्यक्रमात अभिनेता शाहरुख खानने स्वतः खुलासा केला की सिद्धार्थ आनंद त्याच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. अभिनेत्याच्या एका फॅन क्लबने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्याने म्हटले आहे की तो ‘किंग’ वर काम करत आहे. तो म्हणाला, “मी सध्या मुंबईत त्याचे चित्रीकरण सुरु झाले आहे, जेव्हा मी परत जाईन… माझा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद खूप सुंदर आहे. त्याने ‘पठाण’ बनवला. मी तुम्हाला खात्री देतो की हा चित्रपट तुमचे खूप मनोरंजन करेल आणि तुम्हाला खूप आनंद मिळेल.” खूप मजा येईल.” असे अभिनेत्याने म्हटले आहे.
मुलगी सुहाना देखील दिसणार आहे
या चित्रपटात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान देखील दिसणार आहे. सुहानाने झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. तसेच यासह अनेक कलाकार या चित्रपटाचा भाग बनणार आहेत. या चित्रपटाची कथा आणि स्टारकास्ट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. तसेच हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
एसएस राजामौली यांनी ‘SSMB29’ च्या शूटिंगबाबत उचलले हे पाऊल? सर्व कलाकारांसह क्रू ला देखील नियम लागू!
मी ३० वर्षांचा दिसतोय…
नोव्हेंबरमध्ये जेव्हा शाहरुख खान ६० वर्षांचा झाला तेव्हा त्याने विनोदाने म्हटले होते की तो तरुण दिसतो, पण वय हळूहळू त्याच्याशी जुळवून घेत आहे. अभिनेता म्हणाला होता, मी या वर्षी ६० वर्षांचा होत आहे, पण मी ३० वर्षांचा दिसतोय. मी तुम्हाला फक्त हे सांगू इच्छितो की, मला काही गोष्टी आता विसरायला होतात यार.” असे अभिनेत्याने चाहत्यांसह सांगितले. २०२३ मध्ये शाहरुखने ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ हे चित्रपट केले जे प्रेक्षकांना खूप आवडले आणि या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली आहे.