Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेहंदी समारंभाचा आनंद शोकात बदलला, विनोदी कलाकार राकेश पुजारीचे धक्कादायक निधन!

कन्नड रिॲलिटी शो 'कॉमेडी खिलादिलू सीझन ३' मधून लोकप्रियता मिळवलेला विनोदी कलाकार आणि अभिनेता राकेश पुजारी यांचे वयाच्या ३३ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण धक्कादायक आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: May 12, 2025 | 02:09 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे, ज्याने सर्वांचे मन दुखावले आहे. प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि अभिनेते राकेश पुजारी यांचे वयाच्या ३३ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. असे म्हटले जाते की हा विनोदी कलाकार त्याच्या मित्राच्या मेहंदी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी गेला होता. याच दरम्यान त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. राकेश पुजारीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टर अभिनेत्याला वाचवू शकले नाहीत.

कार्यक्रमात अचानक बेशुद्ध झाला अभिनेता
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, डुपी जिल्ह्यातील करकला येथील निट्टेजवळ हा दुर्दैवी अपघात झाला. हा विनोदी कलाकार त्याच्या मित्राच्या मेहंदी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी गेला होता. तिथे रविवारी रात्री उशिरा तो अचानक बेशुद्ध पडला. अभिनेत्याला घटनास्थळी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पण विनोदी कलाकाराला वाचवता आले नाही. दुसरीकडे, करकला टाउन पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटस्फोटाच्या अनेक वर्षांनी Amber Heard ने दिला जुळ्या बाळांना जन्म, नेटकरी चकित, म्हणाले ‘बाबा कोण…?’

अभिनेत्याला या शो मधून मिळाली ओळख
राकेश पुजारीला ‘कॉमेडी खिलादिलू सीझन ३’ या कन्नड रिॲलिटी शोमधून लोकप्रियता मिळाली. २०२० मध्ये प्रसारित झालेल्या या शोमध्ये विजय मिळवल्यानंतर, राकेशला कर्नाटकातील प्रत्येक घरात ओळख मिळाली. खिलादिलू सीझन ३ च्या आधी, राकेश पुजारी २०१८ मध्ये त्याच शोच्या सीझन २ च्या उपविजेत्या संघाचा भाग होता.

 

शोच्या जजने केले दुःख व्यक्त
राकेश पुजारी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या कार्यक्रमाचा एक फोटोही शेअर केला आहे, जो व्हायरल होत आहे. कॉमेडी खिलादिलूची जज आणि अभिनेत्री रक्षिताने त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, ‘नेहमीच अनुकरणीय राकेश… माझा आवडता राकेश… सर्वात गोड, दयाळू आणि सर्वात प्रेमळ व्यक्ती… नम्मा राकेश… आम्हाला, तुझी खूप आठवण येईल.’

‘उर्दूमध्ये लिहून पाठवा…’, पाकिस्तानच्या युद्धबंदी उल्लंघनावर संतापला अली, झाला ट्रोल, नेटकऱ्यांना दिले प्रत्युत्तर

राकेश पुजारीची चित्रपट कारकीर्द
राकेश पुजारी यांनी चैतन्य कलाविदारू थिएटर ग्रुपमधून सादरीकरण कलेच्या क्षेत्रात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. २०१४ मध्ये, तो पहिल्यांदा ‘कडले बाजील’ या तुळु रिॲलिटी शोमध्ये दिसला. हा कार्यक्रम एका खाजगी वाहिनीवर प्रसारित झाला होता. याशिवाय तो ‘पैलवान’ आणि ‘इदू एन्था लोकावय्य’ सारख्या चित्रपटांचाही भाग होता. त्यांच्या इतर चित्रपटांमध्ये ‘इलोक्केल’, ‘अम्मर पोलिस’, ‘पम्मन्ना द ग्रेट’ आणि ‘उमिल’ यांचा समावेश आहे.

Web Title: Comedy khiladigalu season 3 winner rakesh poojary passed away due to heart attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 02:09 PM

Topics:  

  • entertainment
  • south actors
  • tollywood movie

संबंधित बातम्या

Bigg Boss 19: ‘सगळ्यांचा पाळीव कुत्रा…’, अभिषेक बजाजने शहबाजवर केली टीका; कॅप्टन्सी टास्कचा रंगला खेळ
1

Bigg Boss 19: ‘सगळ्यांचा पाळीव कुत्रा…’, अभिषेक बजाजने शहबाजवर केली टीका; कॅप्टन्सी टास्कचा रंगला खेळ

Movie Review : कथा एका विधवेची… पण आवाज संपूर्ण समाजाचा; भावनांचा जिवंत स्पर्श – ‘काकस्पर्श’
2

Movie Review : कथा एका विधवेची… पण आवाज संपूर्ण समाजाचा; भावनांचा जिवंत स्पर्श – ‘काकस्पर्श’

मुनव्वर फारूकीला जिवेमारण्याची धमकी, कोण उठलंय कॉमेडियनच्या जीवावर? पोलिसांनी दिले अपडेट
3

मुनव्वर फारूकीला जिवेमारण्याची धमकी, कोण उठलंय कॉमेडियनच्या जीवावर? पोलिसांनी दिले अपडेट

Bigg Boss 19: अमाल मलिक आणि झीशान कादरीच्या मैत्रीत दरार? चोरी केलेल्या अंड्यांवरून सुरु झाला वाद
4

Bigg Boss 19: अमाल मलिक आणि झीशान कादरीच्या मैत्रीत दरार? चोरी केलेल्या अंड्यांवरून सुरु झाला वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.