Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्याचे तीन पैलू, कसे सोडवतील माधव मिश्रा? Criminal Justice 4 चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेल्या 'क्रिमनल जस्टिस' या मर्डर मिस्ट्री मालिकेच्या चौथ्या सीझनचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. यावेळी माधव मिश्रा यांना कोणत्या नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल हे आपण जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: May 14, 2025 | 05:55 PM
(फोटो सौजन्य - Instagram)

(फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा माधव मिश्राच्या भूमिकेत परतत आहेत. कारण जिओ हॉटस्टारच्या ‘क्रिमिनल जस्टिस’ या शोचा चौथा सीझन परत येत आहे. या मालिकेचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. यावेळी माधव मिश्रा पुन्हा एकदा एका खुनाचे गूढ उलगडताना दिसणार आहेत. यावेळी, मालिकेत विवाहबाह्य संबंधाचा अँगल देखील जोडण्यात आला आहे. एक खून, दोन आरोपी आणि तीन बाजूंनी खटला दाखवणाऱ्या या मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, चाहते या शोसाठी खूप उत्सुक आहेत.

काय आहे ट्रेलरमध्ये खास ?
दोन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की यावेळी माधव मिश्रा यांच्यावर एक हाय प्रोफाइल केस आली आहे. ज्यामध्ये डॉ. राज नागपाल यांच्यावर त्यांच्या प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप आहे. पतीला वाचवण्यासाठी, राज नागपालची पत्नी अंजू नागपाल प्रसिद्ध वकील माधव मिश्रा यांच्याकडे जाते. तसेच, मग अंजू नागपाल स्वतः आरोपी कशी बनते आणि ती स्वतःसाठी वेगळा वकील कसा शोधते? हे सगळं या मालिकेमध्ये दाखवण्यात येणे येणार आहे.

 

भारत-पाकिस्तान तणावामुळे विजय देवरकोंडाच्या ‘किंगडम’ चित्रपटाची रिलीज डेट ढकलली पुढे, कधी होणार प्रदर्शित ?

झीशान अय्युबने केला प्रवेश
झीशान अय्युबने पंकज त्रिपाठीसोबत क्रिमिनल जस्टिसच्या चौथ्या सीझनमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय श्वेता बसू प्रसाद, मीता वशिष्ठ, सुरवीन चावला, आशा नेगी, खुशबू अत्रे, बरखा सिंग आणि आत्मा प्रकाश मिश्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

‘सितारे जमीन पर’ला का केलं जातंय बॉयकॉट, नेमकं कारण काय ?

ही मालिका २९ मे पासून प्रसारित होणार
रोहन सिप्पी दिग्दर्शित ‘क्रिमिनल जस्टिस’चा चौथा सीझन २९ मे पासून जिओ-हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे. बीबीसी स्टुडिओज इंडियाच्या सहकार्याने अप्लॉज एंटरटेनमेंटने याची निर्मिती केली आहे. आतापर्यंत क्रिमिनल जस्टिसचे तीन सीझन प्रदर्शित झाले आहेत. अशा परिस्थितीत, आता चौथ्या सीझनबद्दल प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता आहे.

Web Title: Criminal justice season 4 trailer release pankaj tripathi back as madhav mishra series coming on 29th may

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 05:55 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • OTT Release

संबंधित बातम्या

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’
1

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’

करण कुंद्रा ४ वर्षांपासून तेजस्वीच्या प्रेमात… तरीही नवीन प्रेयसीच्या शोधात? डेटिंग ॲपवरील प्रोफाइलने उडाली खळबळ
2

करण कुंद्रा ४ वर्षांपासून तेजस्वीच्या प्रेमात… तरीही नवीन प्रेयसीच्या शोधात? डेटिंग ॲपवरील प्रोफाइलने उडाली खळबळ

काय ‘तारक मेहता…’ मधील कोमल भाभीने सोडला शो? मालिकेत नवीन पाहुण्यांची होणार एन्ट्री
3

काय ‘तारक मेहता…’ मधील कोमल भाभीने सोडला शो? मालिकेत नवीन पाहुण्यांची होणार एन्ट्री

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? नव्या पात्राबद्दल सुचित्रा बांदेकरचा मोठा खुलासा
4

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? नव्या पात्राबद्दल सुचित्रा बांदेकरचा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.