(फोटो सौजन्य - x अकाउंट)
विजय देवरकोंडा यांनी त्यांच्या आगामी ‘किंगडम’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. विजय देवरकोंडा यांनी सांगितले आहे की त्यांचा पुढचा चित्रपट ‘किंगडम’ आता नियोजित तारखेला प्रदर्शित होणार नाही. हा चित्रपट ३० मे रोजी प्रदर्शित होणार होता पण आता चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आणखी एक तारीख निश्चित करण्यात आली आहे. आता चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
‘आमचे नाते तसेच आहे…’, अरमान मलिक पहिल्यांदाच भाऊ अमालबद्दल झाला व्यक्त, चाहत्यांना दिली गुड न्यूज
‘किंगडम’च्या प्रदर्शन तारखेत बदल
विजयने त्याच्या एक्स अकाउंटवर एक मोठी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर केली. या चित्रपटाचे दिग्दर्शक गौतम तिन्नानुरीसोबतचा एक फोटोही पोस्ट केला. विजयने लिहिले की, “आमच्या ‘किंगडम’ चित्रपटाची रिलीज डेट बदलल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आधी हा चित्रपट ३० मे रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु देशातील सध्याच्या परिस्थितीमुळे आणि काही अचानक घडलेल्या घटनांमुळे आम्ही त्याचे प्रमोशन करू शकत नाही. त्यामुळे आम्ही आता ४ जुलै रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.” असे या पोस्टमध्ये लिहिलेले दिसत आहे. आता प्रेक्षकांना ४ जुलै पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
‘सितारे जमीन पर’ला का केलं जातंय बॉयकॉट, नेमकं कारण काय ?
त्यांनी पुढे लिहिले की, “आम्हाला हा चित्रपट पूर्ण तयारी आणि उत्साहाने तुमच्यासमोर आणायचा आहे. आम्हाला आशा आहे की ४ जुलै रोजी जेव्हा तुम्ही चित्रपटगृहात याल तेव्हा तुम्ही नेहमीप्रमाणे तुमचे प्रेम आम्हाला द्याल.” विजयने चित्रपटाचे निर्माते दिल राजू आणि नितीन यांचेही आभार मानले आणि लिहिले, “त्यांच्या पाठिंब्याबद्दल आणि समजुतीबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. जय हिंद.”
#Kingdom
July 04, 2025.Will see you in the cinemas 🙂 pic.twitter.com/uQUjpngygD
— Vijay Deverakonda (@TheDeverakonda) May 14, 2025
‘किंगडम’ चित्रपटाबद्दल दिली
‘किंगडम’ हा एक अॅक्शन आणि स्पाय चित्रपट आहे जो गौतम तिन्नानुरी यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात भाग्यश्री बोरसे आणि सत्यदेव यांच्यासोबत विजय देवरकोंडा यांच्या भूमिका देखील पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सितारा एंटरटेनमेंट्स आणि फॉर्च्यून फोर सिनेमा यांनी केली आहे आणि अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीत दिले आहे.
या चित्रपटाचा टीझर फेब्रुवारीमध्ये आला होता. या टीझरमध्ये तेलुगू आवृत्तीसाठी ज्युनियर एनटीआर, तमिळ आवृत्तीसाठी सूर्या आणि हिंदी आवृत्तीसाठी रणबीर कपूर यांनी आवाज दिला आहे. हा चित्रपट दोन भागांच्या मालिकेतील पहिला भाग असल्याचे मानले जात आहे.