Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

’10 वर्षे माझ्यासोबत खेळली…’; आकांक्षा चमोलाबद्दल गौरव खन्नाचे वक्तव्य चर्चेत, ‘Lock Upp 2’मधील व्हिडिओ व्हायरल

Gaurav Khanna -Akanksha Chamola: 'लॉक अप २'मध्ये पत्नी आकांक्षा चमोलाच्या घटस्फोटाच्या खुलाशानंतर गौरव खन्नाने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. '10 वर्षे माझ्यासोबत खेळली...' या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 10, 2026 | 10:35 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Gaurav Khanna -Akanksha Chamola: नेटफ्लिक्सवरील रिअॅलिटी शो ‘लॉक अप २’ सध्या विविध खुलास्यांमुळे चर्चेत आहे. नुकतेच अभिनेत्री आकांक्षा चमोलाने शोमध्ये ती आणि तिचा पती गौरव खन्ना घटस्फोट घेत असल्याचा खुलासा केला. याचबरोबर तिने आपण बायसेक्शुअल (उभयलिंगी) असल्याचेही सांगितले. या खुलाशांनंतर आता शोमध्ये पाहुणा म्हणून सहभागी झालेल्या गौरव खन्नाच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.

शोमध्ये गौरवने आकांक्षासोबतच्या नात्यावर मोकळेपणाने भाष्य केले. तो म्हणाला, “सध्या हीच सर्वात मोठी बातमी बनली आहे. आम्ही मे महिन्यात घटस्फोटाबाबत चर्चा केली होती, पण लोकांना वाटतं आमचा घटस्फोट वर्षभरापूर्वीच झाला आहे.”

पुढे तो म्हणाला, “काही जण म्हणत आहेत की ती ‘बिग बॉस’साठी ऑडिशन देत होती आणि मी सहानुभूती मिळवण्यासाठी हे करत आहे. प्रत्येकालाच या प्रकरणावर बोलायचं आहे. लोकांच्या प्रतिक्रियेमुळे मला खूप आश्चर्य वाटलं. कायदेशीरदृष्ट्या तू अजूनही माझी पत्नी आहेस.”

Well said GK ye aurat khel gayi tumhare saath 10 saal 🥺 More power to u Man🫶 U deserve all the happiness n success 🫂#GauravKhanna pic.twitter.com/Cc3EQMIRmV — Bharti💝 (@CurlyTales_20) July 9, 2026


Mysaa: रश्मिका मंदानाचा विक्रम! अंडरवॉटर फाइट सीन शूट करणारी ठरली पहिली अभिनेत्री; 20 तास पाण्यात राहून केलं शूटिंग

संवादादरम्यान आकांक्षा भावूक होऊन रडू लागली. त्यावेळी गौरवने तिला धीर देत खंबीर राहण्याचा सल्ला दिला आणि शो जिंकण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. त्यानंतर आकांक्षाने, “मी हा शो जिंकू शकते का?” असा प्रश्न विचारला. त्यावर फराह खानने तिला खेळाबाबत कोणत्याही सल्ल्याची गरज नसल्याचे म्हटले.

यावेळी गौरवने मिश्कील अंदाजात म्हटले, “तुला काय वाटतं, मला माहीत नाही? जी माझ्यासोबत १० वर्षे खेळली आहे, ती कोणताही शो जिंकू शकते.” त्याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी गौरवला पाठिंबा दिला, तर काहींनी दोघांनाही त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आकांक्षा चमोला आणि गौरव खन्ना यांनी २०१६ मध्ये विवाह केला होता. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली होती. टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, आता त्यांच्या विभक्त होण्याच्या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Govinda : ‘गोळी खिशात घेऊन…’, Lock Upp 2’मध्ये गोविंदाची दमदार एंट्री; पत्नी सुनीता आहुजाच्या वक्तव्यावरही सोडलं मौन

Web Title: Gaurav khannas statement about akanksha chamola grabs attention lock upp 2 video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • Akanksha
  • Entertainemnt News
  • Gaurav Khanna

संबंधित बातम्या

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
1

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
2

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.