Tu He Re Maza Mitwa upcoming twist :स्टार प्रवाहवरील ‘तू ही माझा मितवा’ मालिकेत नवं वळण येत आहे. अर्णव आणि ईश्वरी यांच्या लग्नाच्या ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं. राकेश फसवून ईश्वरीशी लग्न करणार तेच अर्णव ईश्वरीच्या काळजीपोटी तिला राकेशच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करतो. पोलीसांची धाड पडते आणि मग ईश्वरीच्या इज्जतीखातर अर्णव तिच्याशी लग्न करतो. ईश्वरीला कोणी बदनाम करु नये किंवा तिच्या घरच्यांना मानहानीला सामोरं जावं लागू नये म्हणून अर्णव त्याच्या घरच्यांच्या विरोधात जात इतकं मोठं पाऊल उचलतो. मात्र होतं काहीतरी भलतंच इतकं करुनही ईश्वरी अर्णवलाच दोषी मानते. त्याच्या काळजी करण्याला ती स्वार्थ समजत असते. ईश्वरीला राकेशचं सत्य सांगण्याचा प्रयत्न अर्णवने कायमच केलेला. मात्र काही ना काही कारणाने ते राहूनच जायचं. अशातच आता मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर नुकताच मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोनुसार आता राकेशचं सत्य ईश्वरीसमोर येणार आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या प्रोमोनुसार, नवरात्रीच्या निमित्ताने राजेशिर्केंच्या घरात देवीच्या उत्सवाची लगबग सुरु असते. त्यावेळी देवीच्या पुढ्यात असलेली ईश्वरी म्हणते की, आई भवानी मी नऊ दिवस तुझी अखंड सेवा केली तेही मनापासून.तुझा आशिर्वाद काय असूदेत आता कोणतंही संकट येऊ नये, ईश्वरी देवीला प्रार्थना करताना राकेशची एन्ट्री होते. त्याचवेळी राकेश आणि ईश्वरी आमनेसामने येतात.
राकेशला पाहून अर्णवची बहिण अंजली राकेशला राजेश अशी हाक मारत त्याला जाऊन मिठी मारते. हे सगळं पाहून ईश्वरीला धक्का बसतो. तिला चक्कर येत असते. त्यावेळी ईश्वरी तोंडून काही शब्द बाहेर येतात. ती म्हणते की राकेशच राजेश आहे आणि ती चक्कर येऊन खाली पडते. आता ईश्वरीच्या पुढ्यात काय वाढून ठेवलं आहे? खरंच राकेशच राजेश आहे हे तिला कळतं की हे सुद्धा स्वप्नंच आहे ? हे .येत्या काही भागांतून प्रेक्षकांना कळणार आहे. मात्र मालिकेच्या या ट्विस्टमुळे प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचली आहे.
मालिकेचा हा भाग रविवारच्या भागात म्हणजे 5 ऑक्टोबर रोजी पाहायला मिळणार आहे. या प्रोमोला नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. आता तरी तरी अर्णवची काळजी ईश्वरीला समजेल आणि कळेल की राकेश नाही तर अर्णव तिच्यासाठी कसा योग्य आहे ते, अशा काही कमेंट्स मालिकेच्या चाहत्यांनी केल्या आहेत. मराठी मालिका विश्वात सध्या’ तू ही रे माझा मितवा’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.