(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस १९’ हे पर्व सुरुवातीपासूनच वादामुळे चर्चेत आहे. पहिल्या आठवड्यापासूनच घरात वादविवाद, गटबाजी आणि संघर्ष पाहायला मिळत आहेत. याच संघर्षांपैकी एक होता. मराठमोळा स्पर्धक प्रणित मोरे आणि बसीर अली यांच्यातील जुना वाद! मराठमोळ्या प्रणित मोरेला बसीर अलीने “गावी जा” म्हणत हिणवलं होतं. त्यामुळे बसीरला चांगलंच ट्रोलही केलं गेलं. सोशल मीडियावर बसीरवर प्रचंड टीका झाली आणि खुद्द सलमान खाननेही वीकेंड का वारमध्ये बसीरला खडसावलं.
आता नुकत्याच पार पडलेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये पुन्हा एकदा प्रणित आणि बसीर समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले. या टास्कमध्ये सदस्यांना डायनोसॉरला अंडी खाऊ घालून इतर स्पर्धकांना टास्कमधून बाहेर काढायचं होतं.
या टास्कदरम्यान, प्रणित मोरेने संयम न सोडता, पण अत्यंत ठामपणे बसीर अलीला सडेतोड प्रत्युत्तर दिलं, ज्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. प्रेक्षकांनीही प्रणितच्या शांत पण ठाम भूमिका कौतुक केलं आहे.या टास्कमध्ये घरातील सदस्यांना बागेतल्या पिंजऱ्यात डायनासोरप्रमाणे बसायचं होतं, आणि एक सदस्य ‘केअरटेकर’च्या भूमिकेत असणार होता. केअरटेकरला अंडी देऊन एका एका डायनासोरला म्हणजेच सदस्याला टास्कमधून बाहेर काढण्याचं काम देण्यात आलं होतं.
या टास्कची सुरुवात फरहाना भट्टने केली आणि नंतर बसीर अली आणि नीलम गिरी केअरटेकरच्या भूमिकेत सामील झाले.
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बॉलिवूड अभिनेत्रीने केली लेकीच्या नावाची घोषणा, पाहा फोटो
टास्कदरम्यान प्रणीत मोरे, बसीर अली आणि झीशान कादरी यांच्यात तीव्र शाब्दिक बाचाबाची झाली. आधीच प्रणीत आणि बसीरमधील नातं ताणलेलं असून, याआधी बसीरने प्रणीतला “गावी जा” असं म्हणत हिणवलं होतं. त्यामुळे त्यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला.प्रणीतने संयम राखत पण ठामपणे बसीरला प्रत्युत्तर दिलं, तर झीशाननेही यात उडी घेत वातावरण अधिक तापवलं. काही वेळ तर दोघांमध्ये टास्कपेक्षा वादावरच लक्ष केंद्रित झालं.
बसीर प्रणीतला सतत चिडवत राहिला; पण प्रणीतनंही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. प्रणीत बसीरवर टीका करताना म्हणाला, “तुलाच सगळ्यांत आधी घराबाहेर जावं लागणार आहे.” यावेळी त्यानं जुन्या घटनेचा उल्लेख करीत सांगितलं, “बसीरनं मला ‘गावी परत जा’, असं म्हटलं होतं. पण हे लक्षात ठेवा, हा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्रच माझं गाव आहे.”
त्यानंतर बसीर प्रणितला म्हणतो “तुला असं पण इथून काढून टाकणार आहे…थांब जरा”. त्यावर प्रणित म्हणतो, “मला इथून काढूनच दाखव”. नंतर बसीर म्हणतो की, “आम्ही सगळे मिळून तुला इथून काढून टाकू. आता वेळ आमची आहे”. प्रणित बसीरला रिप्लाय देतो की “बघुया कोण जातंय…”