Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indrajaal Movie Trailer : सत्य की भ्रम? रहस्याचा पडदा उघडणार, ‘इंद्रजाल’च्या ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

रहस्य, सस्पेन्स आणि उत्कंठेचा अनोखा मिलाफ असलेला आगामी हिंदी चित्रपट ‘इंद्रजाल'चा बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 13, 2026 | 03:36 PM
google

google

Follow Us
Follow Us:

रहस्य, सस्पेन्स आणि उत्कंठेचा अनोखा मिलाफ असलेला आगामी हिंदी चित्रपट ‘इंद्रजाल’ (Indrajaal) चा बहुप्रतीक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, सोशल मीडियावर त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलरमधील वेधक कथा, प्रभावी संवाद, दमदार पार्श्वसंगीत आणि उत्कंठावर्धक दृश्यरचना यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. ‘इंद्रजाल’चा ट्रेलर सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. प्रत्येक दृश्यामागे दडलेले रहस्य, कथानकातील अनपेक्षित वळणे आणि पात्रांभोवती निर्माण होणारे गूढ वातावरण यामुळे हा चित्रपट एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव देणार असल्याचे स्पष्ट होते.

चित्रपटाची निर्मिती भव्य स्वरूपात करण्यात आली असून, तांत्रिकदृष्ट्याही ‘इंद्रजाल’ सरस ठरण्याची चिन्हे ट्रेलरमधून दिसून येतात. कलाकारांचा प्रभावी अभिनय, उत्कृष्ट छायांकन आणि पार्श्वसंगीतामुळे ट्रेलर अधिक प्रभावी बनला आहे. साधारण ३ मिनिटांचा हा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांनी त्याचे कौतुक करत चित्रपटाबद्दलची उत्सुकता व्यक्त केली आहे. रहस्यप्रधान चित्रपटांच्या चाहत्यांसाठी ‘इंद्रजाल’ ही एक खास पर्वणी ठरणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे.

Mardini Trailer: एका आईच्या वेदनेने घेतलं रणरागिणीचं रूप; मर्दिनी’चा …

‘इंद्रजाल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि संकलन दिग्दर्शक जागेश्वर ललिता ढोबळे यांनी केले आहे. तर निर्मितीची धुरा निर्माती सुचेता अजय निकम यांनी पेलवली आहे. तर सहनिर्माते अजय शिवराम निकम आणि मंगेश शालीग्राम वैती आहेत. चित्रपटाचे लेखन लेखक नामदेव मुरकुटे यांनी केले आहे. तर संपूर्ण चित्रपट आकाश सेठी याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. चित्रपटातील दमदार गाणी गायिका सुवर्णा तिवारी आणि गायक गौरव चाटी यांनी आपल्या प्रभावी आवाजाने स्वरबद्ध केली आहेत. गाण्याच्या संगीताची धुरा गौरव चाटी यांनी उत्तमरित्या पेलवली आहे. तसेच गाण्याची आशयघन शब्दरचना योगेश दांगट यांनी केली आहे. संगीत संयोजन, प्रोग्रामिंग आणि बैकग्राउंड स्कोरची जबाबदारी ऊदय साळवी यांनी सांभाळण्यात कोणतीही कसर सोडली नाही. गाण्याचे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून हरेश सुतार यांनी बाजू सांभाळली.

Indrajaal Trailer : बरसणार अघोरी आभाळ… ‘इंद्रजाल’! जंगल नाही इंद्राचा …

चित्रपटात महेश निकम, शनाया त्रिपाठी, यशराज डिंबळे, नामदेव मुरकुटे, किरण माने, कल्पना सारंग, दर्शना रासाळ, धीरज शर्मा, सत्यम छेत्री, राहुल कुलकर्णी, जीवन वाघ, कल्पेश जगताप, योगेश दांगट, हेमंत पवार, शुभम चव्हाण, लक्ष्मी विभूते, संजना देशमुख, राहुल निकम, प्रतिक्षा सादाकाळे, दीपक देशमुख, वज्र पवार, मल्हार गुरव, अथर्व गाडे, कीर्ती बोडस, अजिम पटेल, ओंकार राऊत आणि विजय इंगळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

२४ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘इंद्रजाल’ या चित्रपटाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असून, त्याचा ट्रेलर प्रेक्षकांसाठी एक भव्य सिनेमॅटिक अनुभव ठरत आहे. आता ट्रेलरनंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली असून, ‘इंद्रजाल’ मोठ्या पडद्यावर कोणते रहस्य उलगडणार, याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.
Indrajaal Movie Trailer

 

Indrajaal Movie Trailer

Web Title: Hindi film indrajaal packed with mystery and suspense set to release on july 24indrajaal movie trailer launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • entertainment
  • Entertainment News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Amey Wagh: फ्रेम’मधील भूमिकेने अमेय वाघला दिलं मोठं आव्हान; अभिनेत्याने सांगितला खास अनुभव
1

Amey Wagh: फ्रेम’मधील भूमिकेने अमेय वाघला दिलं मोठं आव्हान; अभिनेत्याने सांगितला खास अनुभव

Pushkaraj Chirputkar: विनोदी भूमिकांनंतर पुष्कराज चिरपुटकरचा आध्यात्मिक प्रवास; ‘समर्थ’मधील भूमिकेबद्दल शेअर केला अनुभव
2

Pushkaraj Chirputkar: विनोदी भूमिकांनंतर पुष्कराज चिरपुटकरचा आध्यात्मिक प्रवास; ‘समर्थ’मधील भूमिकेबद्दल शेअर केला अनुभव

दीपिका पदुकोणबाबतच्या वक्तव्यावर मुझम्मिल इब्राहिमचं स्पष्टीकरण; म्हणाला, ‘माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला’
3

दीपिका पदुकोणबाबतच्या वक्तव्यावर मुझम्मिल इब्राहिमचं स्पष्टीकरण; म्हणाला, ‘माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला’

Pravin Tarde Proposal Video : ‘हीरोइनने मला 100 कोटी दिले…’ भर पार्टीमध्ये गुडघ्यावर बसत तरडेंनी केलं प्रपोज, VIDEO व्हायरल
4

Pravin Tarde Proposal Video : ‘हीरोइनने मला 100 कोटी दिले…’ भर पार्टीमध्ये गुडघ्यावर बसत तरडेंनी केलं प्रपोज, VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.