Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amey Wagh: फ्रेम’मधील भूमिकेने अमेय वाघला दिलं मोठं आव्हान; अभिनेत्याने सांगितला खास अनुभव

झी ५ मराठीवरील 'फ्रेम' चित्रपटातील भूमिकेबद्दल अभिनेता अमेय वाघने मनमोकळेपणाने भाष्य केले. आत्महत्येच्या दृश्याचं चित्रीकरण करतानाचा भावनिक अनुभव आणि कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन केलेल्या अभिनयाबद्दल त्याने सांगितले.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 13, 2026 | 02:09 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

झी ५ मराठीवर नुकताच प्रदर्शित झालेला ‘फ्रेम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटात अभिनेता अमेय वाघ एका वेगळ्या भूमिकेत दिसत असून, त्याच्या अभिनयाचंही कौतुक होत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अमेयने या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे अनुभव आणि सर्वात भावनिक प्रसंगाविषयी मनमोकळेपणाने भाष्य केलं.

अभिनेता म्हणून कोणत्या प्रसंगाने तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करायला भाग पाडलं? असा प्रश्न विचारण्यात आला असता अमेय म्हणाला, “माझ्या मते, संपूर्ण चित्रपटानेच मला कम्फर्ट झोनच्या बाहेर ढकललं. या चित्रपटात अशा अनेक गोष्टी होत्या, ज्याकडे मला अत्यंत वस्तुनिष्ठपणे पाहावं लागलं. पण मी स्वभावाने खूप भावनिक आहे. आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींशीही मी जोडला जातो. त्यामुळे भावनांपासून दूर राहून प्रसंगांकडे तटस्थपणे पाहणं माझ्यासाठी मोठं आव्हान होतं. म्हणूनच हे संपूर्ण पात्र माझ्यासाठी खूप वेगळं आणि आव्हानात्मक ठरलं.”

Pushkaraj Chirputkar: विनोदी भूमिकांनंतर पुष्कराज चिरपुटकरचा आध्यात्मिक प्रवास; ‘समर्थ’मधील भूमिकेबद्दल शेअर केला अनुभव

चित्रपटातील सर्वात भावनिक प्रसंगाबद्दल बोलताना अमेयने एक आठवण शेअर केली. तो म्हणाला, “आत्महत्येच्या घटनेचं कव्हरेज करण्याचा प्रसंग आजही माझ्या मनात कायम आहे. दिग्दर्शक विक्रम यांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. कलाकारांच्या प्रतिक्रिया नैसर्गिक असाव्यात म्हणून ते आधी संपूर्ण प्रसंग सांगत नाहीत. मी सेटवर पोहोचलो तेव्हा समोर मृतदेहासह संपूर्ण दृश्य उभं होतं. तो अनुभव माझ्यासाठी पहिलाच होता आणि त्याचा माझ्यावर खूप खोल परिणाम झाला.”

अमेय पुढे म्हणाला की, “विक्रम स्वतः पूर्वी फोटो जर्नलिस्ट असल्यामुळे वास्तवदर्शीपणाबाबत त्यांची नजर अतिशय बारकाईची आहे. त्या दृश्यातील प्रत्येक तपशील इतका वास्तववादी होता की, आपण खऱ्या घटनेच्या ठिकाणी उभे आहोत असंच वाटत होतं. त्यामुळे तो प्रसंग माझ्यासाठी अत्यंत अस्वस्थ करणारा आणि भावनिक ठरला. आजही तो अनुभव विसरणं कठीण आहे.”

Aamir Khan’s third wedding: ‘तो आता ट्रिपल इंजिन चालवत आहेत’, आमिरच्या तिसऱ्या लग्नावर शेखर सुमन यांचा टोमणा, मोदींचा केला उल्लेख

‘फ्रेम’मधील या वेगळ्या भूमिकेतून अमेय वाघने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली असून, चित्रपटातील वास्तववादी मांडणी आणि त्याचा अभिनय प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळवत आहे.

Web Title: Amey wagh says his role in frame was a major challenge actor shares his experience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • Amey Wagh
  • marathi movie
  • Nagraj Manjule

संबंधित बातम्या

Kapuskonda Movie: “कापूसकोंड्याची गोष्ट ऐकली का?”; सचिन पिळगावकरांच्या ‘कापूसकोंडा’ची पहिली झलक पाहिली का?
1

Kapuskonda Movie: “कापूसकोंड्याची गोष्ट ऐकली का?”; सचिन पिळगावकरांच्या ‘कापूसकोंडा’ची पहिली झलक पाहिली का?

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’; उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी प्रथमच एकत्र
2

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’; उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी प्रथमच एकत्र

Dwidha Marathi Movie : ‘द्विधा’ चित्रपटातून उलगडणार भाऊ-बहिणीच्या नात्यातील खास बॉन्डिंग ;’आदि-श्रावणी’ची केमिस्ट्री चर्चेत
3

Dwidha Marathi Movie : ‘द्विधा’ चित्रपटातून उलगडणार भाऊ-बहिणीच्या नात्यातील खास बॉन्डिंग ;’आदि-श्रावणी’ची केमिस्ट्री चर्चेत

Mrityu Chakra Movie: गुरु’ नेमका कोण? पुष्कराज चिरपुटकरच्या भूमिकेने वाढवलं ‘मृत्यूचक्र’चं गूढ
4

Mrityu Chakra Movie: गुरु’ नेमका कोण? पुष्कराज चिरपुटकरच्या भूमिकेने वाढवलं ‘मृत्यूचक्र’चं गूढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.