Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pushkaraj Chirputkar: विनोदी भूमिकांनंतर पुष्कराज चिरपुटकरचा आध्यात्मिक प्रवास; ‘समर्थ’मधील भूमिकेबद्दल शेअर केला अनुभव

Pushkaraj Chirputkar: 'समर्थ' चित्रपटातून अभिनेता पुष्कराज चिरपुटकर एका वेगळ्या आणि आध्यात्मिक भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वाधिक जवळची असल्याचे त्याने सांगितले.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 13, 2026 | 12:56 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत वैविध्यपूर्ण भूमिका साकारून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता पुष्कराज चिरपुटकर आता आणखी एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ आणि ‘तिघी’ या चित्रपटांनंतर आता तो ‘समर्थ’ या आगामी चित्रपटात झळकणार असून, या चित्रपटातील त्याचा लूक आणि भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

‘समर्थ’चे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर समर्थ रामदास स्वामींच्या तेजस्वी प्रतिमेसमोर उभा असलेला पुष्कराजचा साधा, सात्त्विक आणि विचारमग्न लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या भूमिकेचा समर्थांच्या विचारांशी नेमका काय संबंध आहे, याबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.

या भूमिकेविषयी बोलताना पुष्कराज म्हणाला, “माझ्या कारकिर्दीत अनेक भूमिका साकारल्या, पण ‘समर्थ’मधील भूमिका माझ्यासाठी अत्यंत खास आहे. ती माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या खूप जवळची आहे. समर्थ रामदास स्वामींचे विचार आणि त्यांची जीवनशैली यांचा माझ्यावर वैयक्तिक प्रभाव आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी अभिनय करण्यापेक्षा ती मनापासून जगण्याचा प्रयत्न केला. हा माझ्यासाठी केवळ अभिनय नव्हता, तर एक आत्मिक अनुभव होता.”

तो पुढे म्हणाला, “‘समर्थ’ हा केवळ मनोरंजन करणारा चित्रपट नाही. हा प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणारा आणि सकारात्मक संदेश देणारा प्रवास आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना माझी एक पूर्णपणे वेगळी बाजू पाहायला मिळेल.”

Prajakta Gaikwad : शूटिंगमधून वेळ काढत प्राजक्ता गायकवाडची पंढरीवारी; अभिनेत्रीच्या साधेपणाचं होतंय कौतुक, शेअर केलं सुंदर फोटो

थर्मोलाईन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत आणि ए३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित, योगेश फुलफगर दिग्दर्शित ‘समर्थ’ हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात पुष्कराज चिरपुटकरसोबत शर्वरी जमेनीस, भूषण प्रधान, ईशा केशकर, दिशा परदेशी, प्रसाद खांडेकर, राजन भिसे, निखिल राऊत, अयान दरेकर, श्रीजय देशपांडे आणि अभिज्ञा माथवड यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Prajakta Gaikwad : शूटिंगमधून वेळ काढत प्राजक्ता गायकवाडची पंढरीवारी; अभिनेत्रीच्या साधेपणाचं होतंय कौतुक, शेअर केलं सुंदर फोटो

Web Title: After comedy roles pushkaraj chirputkar spiritual journey shares his experience about his different role in samarth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

Badshah New Marathi Rap: ‘चिमणा’ची उंच भरारी! बादशाहच्या रॅपचा तडका, ‘गोंधळ’चं लोकगीत जगभर गाजलं
1

Badshah New Marathi Rap: ‘चिमणा’ची उंच भरारी! बादशाहच्या रॅपचा तडका, ‘गोंधळ’चं लोकगीत जगभर गाजलं

Orry and Samay Raina: समय रैनाच्या शोमध्ये ओरीचा राडा? भर कार्यक्रमात दिली धमकी, नेमकं काय घडलं?
2

Orry and Samay Raina: समय रैनाच्या शोमध्ये ओरीचा राडा? भर कार्यक्रमात दिली धमकी, नेमकं काय घडलं?

‘फुलों का तारों का’ रक्षाबंधनासाठी लिहिलंच नव्हतं; ५५ वर्षांपूर्वी लता मंगेशकरांनी जे केलं, ते पाहून पंचम दाही झाले होते थक्क
3

‘फुलों का तारों का’ रक्षाबंधनासाठी लिहिलंच नव्हतं; ५५ वर्षांपूर्वी लता मंगेशकरांनी जे केलं, ते पाहून पंचम दाही झाले होते थक्क

The Paradise: नानीच्या ‘द पैराडाइज’च्या दुसऱ्या सिंगलचा डॅलसमध्ये ग्रँड लॉन्च; अनिरुद्धच्या कॉन्सर्टमध्ये होणार धमाका!
4

The Paradise: नानीच्या ‘द पैराडाइज’च्या दुसऱ्या सिंगलचा डॅलसमध्ये ग्रँड लॉन्च; अनिरुद्धच्या कॉन्सर्टमध्ये होणार धमाका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.