दिवाळीत होणार धमाका! उघडणार भयानक रहस्यचे दार, कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3'चे पहिले पोस्टर समोर (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
अनीस बज्मीच्या ‘भूल भुलैया’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटाच्या पुढील भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. दरम्यान, कार्तिक आर्यनच्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ‘भूल भुलैया 3’मध्ये अभिनेत्री विद्या बालन पुन्हा एकदा मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. त्याचवेळी या हॉरर-कॉमेडी सिनेमात माधुरी दीक्षितच्या उपस्थितीची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करण्यासोबतच ‘भूल भुलैया 3’चा भयानक दरवाजा कधी उघडणार हेही निर्मात्यांनी सांगितले आहे.
पहिले पोस्टर केले रिलीज
‘भूल भुलैया 3’ च्या पहिल्या पोस्टरमध्ये आत्मा ज्या दरवाजाच्या आत आहे ते दाखवले आहे. हा दरवाजा अनेक वर्षांपासून बंद आहे, जो ‘रुह बाबा’ म्हणजेच कार्तिक आर्यन उघडणार आहे. पोस्टरमध्ये रुद्राक्ष जपमाळ आणि लाल धाग्याने बांधलेले कुलूप दिसत आहे. त्याचवेळी दारावर अनेक ठिकाणी रक्ताच्या खुणा आहेत. हे पोस्टर बघून चाहत्यांची हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा वाढली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत्या दिवाळीत येणार आहे.
चित्रपटाचा टीझर कधी होणार रिलीज
‘भूल भुलैया 3’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरने चाहत्यांची मने जिंकली आहेत. हा सिनेमा रिलीज होण्यासाठी आता काहीच महिने बाकी आहेत. प्रेक्षकांना दिवाळीपर्येंत या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे. अशा परिस्थितीत त्याच्या टीझरची माहिती समोर आली आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, ‘भूल भुलैया 3’ चा टीझर 27 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे, जो 1 मिनिट 32 सेकंदांचा असू शकतो.
हे देखील वाचा- अपारशक्ती खुराणाच्या मुलीने केले आहे ‘बर्लिन’मध्ये काम? अभिनेत्याने शेअर केला सेटवरील फोटो!
‘सिंघम अगेन’सोबत होणार टक्कर
‘भूल भुलैया 3’ची टक्कर ‘सिंघम अगेन’ या ॲक्शन चित्रपटाशी होणार आहे. अशा परिस्थितीत, बॉक्स ऑफिसवर दोन मोठ्या चित्रपटांमधील संघर्ष आणि या संघर्षाचा त्यांच्या कलेक्शनवर काय परिणाम होतो हे पाहणे पुन्हा एकदा मनोरंजक असणार आहे.






