Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mithun Chakraborty: बीएमसीने मिथुन चक्रवर्ती यांना पाठवली नोटीस; बेकायदेशीर बांधकाम संबंधित प्रकरण!

बीएमसीने ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. बेकायदेशीर बांधकामामुळे अभिनेत्याला ही नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: May 18, 2025 | 11:49 AM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Follow Us:

बीएमसीने ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कथित बेकायदेशीर बांधकामामुळे अभिनेत्याला ही नोटीस बजावण्यात आली आहे. फ्री प्रेस जर्नलमधील एका वृत्तानुसार, १० मे च्या सूचनेपासून सात दिवसांच्या आत बांधकामाचे समर्थन करण्याचे निर्देश अभिनेत्याला देण्यात आले आहे. तसेच आता अभिनेत्याने कोणते बेकायदेशीर बांधकाम नक्की काय केले आहे जाणून घेऊयात.

सोनालीला सहन करावा लागलेला मानसिक छळ, सिनेइंडस्ट्री सोडण्याची आलेली वेळ; ‘तो’ एक निर्णय आला कामी

बीएमसी करणार कारवाई
मालाडमधील एरंगल गावातील एका भूखंडावर बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या आरोपाखाली मिथुन चक्रवर्ती यांना ही नोटीस देण्यात आली आहे. समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यास, मालकाच्या जोखमीवर बांधकाम पाडले जाईल आणि कायदेशीर कारवाई देखील केली जाण्याची शक्यता आहे. असा इशारा महापालिकेने अभिनेत्याला दिला आहे. मढ परिसरातील बेकायदेशीर बांधकामांवर बीएमसीने केलेल्या मोठ्या कारवाईचा एक भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

१०१ बेकायदेशीर बांधकामे आढळून आली
अधिकाऱ्यांनी या परिसरात १०१ बेकायदेशीर बांधकामे ओळखली आहेत. अहवालानुसार, बीएमसीच्या सूत्रांनी सांगितले की, हीरा देवी मंदिराजवळील अलिकडेच केलेल्या तपासणीत असे आढळून आले की दोन बहुमजली इमारती, एक तळमजला रचना आणि तीन तात्पुरते युनिट्स विटा, लाकूड, काच आणि एसी शीटपासून बनवलेले होते. संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य परवानगी न घेता हे बांधकाम करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

सांगितीक मैफिल घडवणाऱ्या ‘अष्टपदी’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…

मिथुन चक्रवर्ती काय म्हणाले?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, एमएमसी कायद्याच्या कलम ४७५अ अंतर्गत उल्लंघन केल्यास दंड आणि तुरुंगवास देखील होऊ शकतो. “या इमारती सक्षम अधिकाऱ्यांच्या मंजुरीशिवाय बांधण्यात आल्या होत्या,” असे अधिकाऱ्याने सांगितले. म्हणूनच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आरोपांना उत्तर देताना, अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. पोर्टलने उद्धृत केलेल्या निवेदनात ते म्हणाले, ‘माझ्याकडे कोणतेही बेकायदेशीर बांधकाम नाही. अनेक लोकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत आणि आम्ही आमची उत्तरे पाठवत आहोत.’

Web Title: Mithun chakraborty got show cause notice by bmc over alleged illegal construction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 11:49 AM

Topics:  

  • BMC
  • Entertainmnet
  • mithun chakraborty

संबंधित बातम्या

Thane Water leakage :- ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मुंबई III जलवाहिनीला मोठी गळती.
1

Thane Water leakage :- ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मुंबई III जलवाहिनीला मोठी गळती.

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.