Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Dhurandhar 2’ला प्रोपेगंडा म्हणणाऱ्यांवर भडकले Mithun Chakraborty; म्हणाले “हे थांबवून तर दाखवा…”

ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी 'धुरंधर २: द रिव्हेंज' या चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे, ज्याला प्रोपेगंडा म्हटले जात आहे. तसेच अभिनेता यावर नक्की काय म्हणाला जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 02, 2026 | 03:46 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘धुरंधर २’ प्रोपेगंडा म्हणणाऱ्यांवर मिथुन चक्रवर्ती भडकले
  • “आता हे थांबवून दाखवा…” साधला निशाणा
  • ‘द बेंगाल फाइल्स’ बद्दलही मांडले मत
 

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. रणवीर सिंगचा ‘धुरंधर २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक विक्रम मोडत आहे. नुकतेच, ‘धुरंधर २’ ने बॉक्स ऑफिसवर १००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. एकीकडे चित्रपटाचे खूप कौतुक होत असताना, दुसरीकडे त्याला प्रोपेगंडा चित्रपट म्हटले जात आहे. आता, ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया, मिथुन चक्रवर्ती यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काय म्हटले आहे.

मिथुन चक्रवर्ती यांनी रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ चित्रपटाचे केले कौतुक

रणवीर सिंगचा ‘धुरंधर २’ हा चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे. आणि आता यावर मिथुन चक्रवर्ती यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आयएएनएसशी बोलताना, मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या २०२५ साली प्रदर्शित होणाऱ्या ‘द बेंगाल फाइल्स’ या चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त केले, ज्याला प्रदर्शित होऊ दिले गेले नाही. ते म्हणाले की, जर त्यांच्या चित्रपटाला अशा परिस्थितीचा सामना करावा लागला, तर ‘धुरंधर २’ ला सुद्धा प्रदर्शित होऊ द्यायला नको होते.

“मला निदान फोन तरी करा…”, Dhurandhar 2 च्या निर्मात्यांवर पाकिस्तानी कॉप चौधरी असलमच्या पत्नीने साधला निशाणा

ते पुढे म्हणाले, “‘द बेंगाल फाइल्स’ चित्रपटाला प्रदर्शित होऊ न देण्यापेक्षा अधिक दुःखद काय असू शकते? आता तुम्ही ‘धुरंधर’ला प्रोपेगंडा चित्रपट म्हणता, मग तुम्ही ‘धुरंधर’लाही का थांबवायला नको होते? ‘धुरंधर’ प्रदर्शित झाला आणि आता तुम्ही म्हणत आहात की तो प्रोपेगंडा चित्रपट आहे. पण ‘द बेंगाल फाइल्स’ला तर प्रदर्शित होऊ दिले नाही. बंगालमध्ये त्याच्या विरोधात जाऊन, चित्रपटाला प्रदर्शित होऊ दिले नाही. यापेक्षा अधिक दुःखद काय असू शकते?”

मिथुन चक्रवर्ती पुढे म्हणाले की, ‘द बेंगाल फाइल्स’ हा चित्रपट स्वातंत्र्यापूर्वी झालेल्या नोआखली दंगलींवर आधारित होता, तरीही त्याला प्रदर्शित होऊ दिले नाही. आदित्य धरच्या चित्रपटाचा बचाव करताना मिथुन चक्रवर्ती म्हणाले, “तुम्ही दादागिरीबद्दल काहीही म्हणा, पण धुरंधरने सर्व विक्रम मोडले आहेत. म्हणूनच इतक्या लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे. प्रत्येक समाजातील लोकांनी तो पाहिला आहे, त्याचे कौतुक होत आहे आणि कोणताही चित्रपट दोन-तीन वेळा पाहिल्यानंतरच व्यवसाय करतो.” असे अभिनेत्याचे म्हणणे आहे.

Sanai Chaughade : ‘सनई चौघडे’ मालिकेची धमाकेदार सुरुवात… चिन्मय मांडलेकरची दमदार एंट्री!

‘धुरंधर 2’मध्ये चमकले हे बॉलीवूड स्टार

‘धुरंधर 2’ चित्रपटात रणवीर सिंग व्यतिरिक्त संजय दत्त, आर माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, राकेश बेदी आणि दानिश इक्बाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळाल्या आहेत. अशातच सगळ्यांच्या अभिनयाचे प्रेक्षक कौतुक करत आहे, बॉक्स ऑफिसवर चित्रपट सध्या धुमाकूळ घालत असून पुढे हा किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Mithun chakraborty on ranveer singh dhurandhar 2 propaganda row talks about bengal files release stopped

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • mithun chakraborty
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?
1

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
2

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
3

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’;  चाहत्यांसाठी खास सरप्राइज
4

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’; चाहत्यांसाठी खास सरप्राइज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.