Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर राजपाल यादव यांची सुटका? फेडली एवढी रक्कम; अभिनेत्याच्या वकिलांनी दिला संपूर्ण हिशोब

चेक बाउन्स प्रकरणात तिहार तुरुंगात असलेल्या राजपाल यादव यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. अभिनेत्याच्या वकिलाने त्याच्या कर्जापैकी किती रक्कम भरली आहे हे उघड केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 13, 2026 | 10:30 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अखेर राजपाल यादव यांची सुटका?
  • फेडली एवढी कर्जाची रक्कम
  • अभिनेत्याच्या वकिलांने केला खुलासा
 

राजपाल यादव सध्या दीर्घकाळ चालणाऱ्या चेक बाउन्स प्रकरणात तिहार तुरुंगात आहेत. गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात त्यांच्या जामिन अर्जावर सुनावणी झाली. परंतु, त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही आणि पुढील सुनावणी येत्या १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. न्यायालयाने तक्रारदार मुरली प्रोजेक्ट कंपनीला नोटीस देखील बजावली आहे. राजपाल यादव यांचे वकील भास्कर उपाध्याय यांनी सांगितले की, जामिनाची सुनावणी पुढे ढकलण्याचे कारण म्हणजे त्यांना दुसऱ्या पक्षाला उत्तर देणे आवश्यक आहे. त्यांनी असेही सांगितले की, अभिनेत्याचे अर्धे कर्ज फेडले गेले आहे.

नानी-ओडेला पुन्हा एकत्र घालणार धुमाकूळ; ‘The Paradise’चा धमाकेदार पोस्टर चर्चेत

कंपनीने पैसे स्वीकारण्यास नकार दिल्याचा खुलासा

राजपाल यादव यांच्या वकिलांनी सांगितले की ५ कोटी रुपयांपैकी २.५ कोटी रुपये देण्यात आले आहेत आणि सोमवारी न्यायालयात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. वकिलाने पुढे म्हटले की, “पाच कोटी रुपयांची जी गुंतवणूक करण्यात आली होती, ती रक्कम देण्यास अभिनेत्याने कधीही नकार दिला नाही. यापूर्वीही जेव्हा देयकाबाबत चर्चा झाली होती, तेव्हा संबंधित कंपनीने पैसे स्वीकारण्यास नकार दिला होता.” “भास्कर उपाध्याय यांनी स्पष्ट केले की हा खटला २०१२ च्या कराराच्या आधारे चालवला जात आहे. या काळात राजपाल यादव यांनी तीन महिने शिक्षा भोगली आहे. राजपाल यादव यांना पैसे कोणी दिले? मी यावर भाष्य करू शकत नाही, कारण हा कौटुंबिक प्रश्न आहे.” असे ते म्हणाले.

भाचीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी जामीन अर्ज

तसेच राजपाल यादव यांनी शाहजहांपूर येथे भाचीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी जामीन अर्ज केला होता, परंतु न्यायालयाने अद्याप या प्रकरणावर अंतिम निर्णय दिलेला नाही. अभिनेत्याच्या जामिनावर पुढील सुनावणी १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

राम चरण आणि उपासनाने केले त्यांच्या जुळ्या मुलांचे नामकरण; सांगितला गोंडस मुलांच्या नावाचा अर्थ

राजपाल यांना ४ फेब्रुवारी रोजी सरेंडर होण्याचे दिले आदेश

अखेर, अनेक चेक बाउन्स प्रकरणांमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राजपाल यादवने तिहार तुरुंगात सरेंडर केले. २०१० मध्ये राजपाल यादवने “आता पता लापता” हा चित्रपट बनवण्यासाठी कर्ज घेतले होते परंतु ते परतफेड करू शकला नाही. २०१८ मध्ये, एका दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेता आणि त्याच्या पत्नीला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर, त्यांच्याविरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम १३८ अंतर्गत खटला दाखल करण्यात आला. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना अनेक संधी दिल्या, परंतु वारंवार आश्वासने देऊनही, पैसे न दिल्यामुळे न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली. अखेर राजपाल यांना ४ फेब्रुवारी रोजी सरेंडर करण्याचे आदेश देण्यात आले.

Web Title: Rajpal yadav lawyer said actor has paid half the amount in cheque bounce case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Film
  • entertainment

संबंधित बातम्या

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
1

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा
2

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
3

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
4

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.