Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sana Khan Viral Video: ‘कब्र की तैयारी करो’, सना खानच्या व्हिडिओने वेधलं सर्वांचं लक्ष; सोशल मीडियावर खळबळ

अभिनेत्री सना खानचा 'कयामत' आणि मृत्यूनंतरच्या आयुष्याविषयीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या संदेशाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 01, 2026 | 02:49 PM
( फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

( फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

एकेकाळी बॉलिवूड आणि टीव्ही विश्वात सक्रिय असलेली सना खान आता धार्मिक विषयांवरील पोस्ट आणि व्हिडिओंमुळे सातत्याने चर्चेत असते. अभिनय क्षेत्राला अलविदा केल्यानंतर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून इस्लामशी संबंधित संदेश देण्यास सुरुवात केली. दरम्यान, तिचा एक नवा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत सना लोकांना मृत्यूचे स्मरण ठेवण्याचा आणि आयुष्याचा योग्य उपयोग करण्याचा सल्ला देते. ती म्हणते की, माणूस जिवंत असताना नाती, संपत्ती आणि प्रसिद्धी यांना महत्त्व देतो; मात्र मृत्यूनंतर प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त होतो. त्यामुळे इतरांकडून अपेक्षा ठेवण्याऐवजी स्वतःच्या कर्मांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

सना व्हिडिओमध्ये म्हणते, “तुमच्या मृत्यूनंतर तुमची मुलं, नातेवाईक किंवा जवळची माणसं कायम तुमच्यासाठी प्रार्थना करतील, अशी अपेक्षा ठेवू नका. आज जे लोक तुमच्या सांगण्यावरून धार्मिक कर्तव्ये पार पाडत नाहीत, ते उद्या तुमच्यासाठी काय करतील? म्हणून दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतःच आपल्या शेवटच्या प्रवासाची तयारी करा.”

 

तिने पुढे प्रलयकाळाचा उल्लेख करत लोकांना आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. “जगात प्रामाणिकपणा कमी होत चालला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कर्मांचा हिशोब ठेवावा आणि मृत्यूनंतरच्या आयुष्याची तयारी आतापासूनच सुरू करावी,” असेही ती म्हणाली.

Actor Lip Kiss Video: २५ वर्षांनी लहान इन्फ्लुएन्सरला ‘या’ अभिनेत्याने जबरदस्ती केले किस, Video व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

सनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी तिचा संदेश धार्मिक श्रद्धेशी जोडत त्याचे स्वागत केले आहे, तर काहींनी तो जीवनाकडे गांभीर्याने पाहण्याचा आणि आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला असल्याचे म्हटले आहे.

सना खानने २०२० मध्ये मनोरंजन क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तिने इस्लामिक विद्वान मुफ्ती अनस सय्यद यांच्याशी विवाह केला. सध्या ती दोन मुलांची आई असून कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर ती नियमितपणे धार्मिक आणि प्रेरणादायी विचार शेअर करत असते.

Samantha Ruth Prabhu: सामंथा रुथ प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो, कॅप्शनने वेधलं लक्ष; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Web Title: Sana khan viral video prepare for your grave says sana khan her video grabs attention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Toxic: ‘टॉक्सिक’मधील अभिनेत्रींचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज; नयनतारा, कियारासह स्टारकास्टचा दमदार अंदाज
1

Toxic: ‘टॉक्सिक’मधील अभिनेत्रींचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज; नयनतारा, कियारासह स्टारकास्टचा दमदार अंदाज

Gen-Z कमिटमेंटला घाबरत नाही! सिद्धार्थ मेननने नातेसंबंधांवर मांडला वेगळा दृष्टिकोन
2

Gen-Z कमिटमेंटला घाबरत नाही! सिद्धार्थ मेननने नातेसंबंधांवर मांडला वेगळा दृष्टिकोन

माळीण दुर्घटनेची हृदयद्रावक कहाणी मोठ्या पडद्यावर; ‘एक होतं माळीण’चा दमदार टीझर रिलीज
3

माळीण दुर्घटनेची हृदयद्रावक कहाणी मोठ्या पडद्यावर; ‘एक होतं माळीण’चा दमदार टीझर रिलीज

‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्रीच्या घरी लवकरच चिमुकल्याचं आगमन; बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज
4

‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्रीच्या घरी लवकरच चिमुकल्याचं आगमन; बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.