(फोटो सौजन्य- Instagram)
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आज २९ जुलै रोजी त्याचा ६५ वा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. या अभिनेत्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पत्नी मान्यताने त्यांना इंस्टाग्रामवर प्रेमाने शुभेच्छा दिल्या आहेत. आणि आता याचदरम्यान अभिनेत्या त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यांनी संजय दत्त यांनी स्वतः त्यांच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पुन्हा एकदा हा अभिनेता साऊथ चित्रपटात दिसणार आहे तो शेवटचा लिओ या चित्रपटात दिसला होता आणि आता तो लवकरच ‘केडी’ – द डेव्हिल’मध्ये दिसणार आहे. त्यांचा हा पोस्टरमधून शेअर केलेला लुक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
संजय दत्तचा ‘केडी’ – द डेव्हिल’ लूक
त्याच्या वाढदिवसानिमित्त, अभिनेत्याने त्याच्या आगामी चित्रपट ‘केडी – द डेव्हिल’ ची घोषणा करण्यासाठी त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर या चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्टर देखील शेअर केला. या चित्रपटात तो ‘धक देवा’ची भूमिका साकारणार आहे. हे दमदार पोस्टर शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “दैत्य लोकशाहीचा देव, धक देवा, केडीच्या विंटेज रणांगणात उतरला आहे आणि आता वादळ निर्माण करण्याची त्याची पाळी आहे.” असे लिहून त्यांनी हे चाहत्यांना थक्क केले आहे.
या पोस्टरमध्ये अभिनेता विंटेज कारसमोर उभा आहे, डोक्यावर पोलिसांची टोपी, हातात लाल काठी, गळ्यात पोलिसांचा पट्टा, बिबट्या प्रिंटचा शर्ट, त्यावर डेनिम जॅकेट, खाली काळी लुंगी, बूट घातले आहेत. त्याचे पाय, मोठे केस आणि तो दाढी, डोळ्यांवर चष्मा आणि कपाळावर टिळक घातलेला या पोस्टरमध्ये दिसत आहे.
सिनेमा ॲक्शन थ्रिलर असणार
ध्रुव सर्जा स्टारर ‘केडी’ – द डेव्हिल’ हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये रेश्मा, नोरा फतेही, शिल्पा शेट्टी आणि विजय सेतुपती महत्त्वाच्या भूमिकेत झळकताना दिसणार आहेत.
हे देखील वाचा- कृष्णा श्रॉफने ‘खतरों के खिलाडी 14’ मधील तिचा पहिला स्टंट अवघ्या 6 मिनिटे आणि 23 सेकंदात केला पूर्ण!
कधी होणार चित्रपट प्रदर्शित
13 नोव्हेंबरला हा चित्रपट कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. तसेच, हा चित्रपट प्रेमने लिहिला होता आणि तोच याचे दिग्दर्शनही करत आहे. चित्रपटाचा निर्माता सुप्रीत असून केव्हीएन प्रोडक्शनच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवण्यात येत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यावर लवकरच हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होईल.