(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे फक्त चित्रपट क्षेत्रातच नाही तर व्यावसायिक क्षेत्रातही आपले नशीब आजमावत असतात. मुंबईमध्ये बॉलिवूड स्टार्सची रेस्टॉरंट्स आहेत. आता या यादीत बॉलीवूडचा खलनायक संजय दत्तही सामील झाला आहे. संजय दत्तने 20 सप्टेंबर त्याचे रेस्टॉरंट लॉन्च केलं. त्यानिमित्त एक मोठा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता, त्याच्या रेस्टोरेंटच्या उद्घाटन सोहळ्यात संजय दत्त पत्नी मान्यताही सोबत उपस्थित होती.
संजय दत्तने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि डिझायनर लेदर जॅकेट घातल्याचे दिसत आहे. दरम्यान, अभिनेत्याची पत्नी मान्यता दत्त शॉर्ट ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.संजय दत्त आणि पत्नी मान्यताचा लुक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला असून, त्यांच्या स्टायलिश अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चाहत्यांना या जोडप्याचा रॉयल लूक खूप आवडला असून चाहत्यांनी त्याच्या या व्हिडिओवर त्यांचे कौतुक केलं आहे.संजय दत्तचं हे रेस्टोरेंट त्याच्या नवीन व्यवसायात एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
हॉरर, सस्पेन्सने भरलेल्या ‘काजळमाया’ मालिकेतील चेटकिणीची मुख्य भूमिका साकारणार ‘ही’ अभिनेत्री
संजय दत्त हा एक प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेता असून, त्याची कारकीर्द हिंदी चित्रपट उद्योगातील सर्वात चर्चित आणि चर्चेत असलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे.संजय दत्तने 1981 मध्ये “रॉकी” या चित्रपटातून चित्रपट उद्योगात पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात त्याच्या अभिनयाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला, परंतु त्याच्या जीवनातील विविध अडचणी आणि संघर्षांनी त्याच्या करिअरवरही परिणाम केला.
मी सांगू शकत नाही…” दिग्दर्शक प्रियदर्शनने ‘हेरा फेरी 3’वर मौन सोडलं!
त्याने “मुन्ना भाई एम.बी.बी.एस.”, “लगे रहो मुन्ना भाई”, “संजू”, “वास्तव”, “कांटे”, “कुली नं. 1” आणि “धम्माल” सारख्या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आणि त्याला एक प्रमुख अभिनेता म्हणून ओळखलं जातं.या वर्षी संजय दत्तचे अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, ज्यात ‘धुरंधर’ हा चित्रपटदेखील आहे, ज्यामध्ये तो बॉलीवूड स्टार रणवीर सिंहबरोबर दिसणार आहे. हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.