Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanju Rathodचं ‘गुलाबी साडी’ आता नव्या अंदाजात; ‘गुलाबी रंग’ गाण्याचा टीझर रिलीज, रितेशसोबत थिरकली ‘ही’ अभिनेत्री

Sanju Rathod Gulabi Rang Teaser release : 'गुलाबी साडी या गाण्याच्या यशानंतर आता संजू राठोडने त्याचं हिंदी रूपांतर 'गुलाबी रंग' या नावाने सादर केलं आहे. या गाण्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 26, 2026 | 12:31 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गायक संजू राठोडची बॉलिवूडमध्ये एन्ट्री
  • गुलाबी साडी आता नव्या अंदाजात
  • गुलाबी रंग या हिंदी गाण्याचा टीझर रिलीज
Sanju Rathod Gulabi Rang Teaser release : मराठी गायक संजू राठोड याच्या ‘गुलाबी साडी’ या सुपरहिट गाण्याने देशभरात लोकप्रियता मिळवली होती. आता संजू राठोड बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. आता गुलाबी साडी या गाण्याचं नव्या अंदाजातील बॉलिवूड व्हर्जन ‘गुलाबी रंग’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, याचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.2024 मध्ये सोशल मीडियावर संजू राठोडच्या गुलाबी साडी या गाण्याने सोशल मीडियावर इतिहास रचला होता. आता या सुपरहिट गाण्याचे हिंदी व्हर्जन थेट धमाल 4 या बॉलिवूड चित्रपटात पाहायला मिळणार आहे. संजूने नुकताच या गुलाबी रंग या नव्या हिंदी गाण्याची झलक शेअर केली आहे. या गाण्यात अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री अंजली आनंद आणि स्वत: संजू राठोड दिसत आहे.

टीझरमध्ये अभिनेत्री अंजली गुलाबी रंगाच्या आकर्षक साडीत तर अभिनेता रितेश देशमुख पांढऱ्या रंगाच्या पारंपरिक आउटफिटमध्ये दिसत आहे. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आणि दमदार डान्स मूव्ह्ज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

विशेष म्हणजे, या गाण्यात संजू राठोड स्वतःही झळकणार आहे. ‘गुलाबी साडी’च्या प्रचंड यशानंतर तयार करण्यात आलेलं ‘गुलाबी रंग’ हे गाणं आगामी ‘धमाल ४’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Prahaar Teaser Out: राजकुमार रावच्या दमदार अभिनयाने सोशल मीडियावर माजवली खळबळ; 1 मिनिट 54 सेकंदांच्या टीझरने वाढवली उत्सुकता

Welcome To The Jungle Review: कॉमेडी, इमोशन आणि मनोरंजनाचा फुल्ल डोस; अक्षय-सुनीलची जोडी पुन्हा जिंकणार मनं

टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ‘गुलाबी साडी’प्रमाणेच ‘गुलाबी रंग’ हे गाणंदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता संपूर्ण गाणं कधी प्रदर्शित होणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

संजू राठोडचं ‘गुलाबी साडी’ हे गाणं २०२४ मध्ये प्रचंड गाजलं होतं. या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आजही तरुणाईमध्ये या गाण्याची लोकप्रियता कायम असून, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाखो रील्स या गाण्यावर तयार करण्यात आल्या आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-विदेशातही ‘गुलाबी साडी’या गाण्याने लोकांना वेड लावलं होते.

Web Title: Sanju rathod gulabi sadi gets a new twist gulabi rang teaser out riteish deshmukh dance with this actress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 12:31 PM

Topics:  

  • bollywood movies
  • ritesh deshmukh
  • sanju rathod

संबंधित बातम्या

Love And War Alia Bhatt: आलिया भट्टचा कॅबरे-स्टाइल ग्लॅमरस अंदाज; ‘लव्ह अँड वॉर’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
1

Love And War Alia Bhatt: आलिया भट्टचा कॅबरे-स्टाइल ग्लॅमरस अंदाज; ‘लव्ह अँड वॉर’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

Ranbir Kapoor Love and War movie: हातावर जखमा, डोळ्यांवर गॉगल अन् जबरदस्त स्वॅग; लव्ह अँड वॉर’मधील रणबीरचा लूक चर्चेत
2

Ranbir Kapoor Love and War movie: हातावर जखमा, डोळ्यांवर गॉगल अन् जबरदस्त स्वॅग; लव्ह अँड वॉर’मधील रणबीरचा लूक चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.