(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
मराठी संगीत क्षेत्रात म्युझिक व्हिडिओ हा प्रकार गेल्या काही वर्षांत सप्तसूर म्युझिकने पुनरुज्जीवित केला आहे. सप्तसूर म्युझिकने म्युझिक व्हिडिओ निर्मितीमध्ये शंभरीचा टप्पा गाठला असून, गायिका शयोनी बागची यांच्या “कोई आनेवाला है” या गाण्याचा शंभरावा व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे. या व्हिडीओला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच हे गाणं चाहत्यांना नक्कीच आवडणार आहे.
२५ दिवसांनंतर, सैफ अली खानने सोडले मौन; हल्लेखोराबाबत मोठे वक्तव्य, म्हणाला – “त्या बिचाऱ्या…”
साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांच्या सप्तसूर म्युझिकने मराठी संगीत विश्वात सातत्याने वेगळ्या पद्धतीचे काम करत अनन्यसाधारण ओळख निर्माण केली आहे. म्युझिक व्हिडिओ या प्रकारात रोमँटिक म्युझिक व्हिडिओसह गणेशोत्सव, बोलीभाषांमधील गाण्यांच्या व्हिडिओची निर्मिती केली आहे. त्यामुळे सप्तसूर म्युझिकला सर्वदूर प्रतिसाद मिळाला आहे. या युट्यूब चॅनेलला ८० हजार सबस्क्रायबर्स आहेत.
“कोई आनेवाला है” या शंभराव्या म्युझिक व्हिडिओतील गाणं गायिका शयोनी बागची यांनी गायलं आहे. विकास चौहान यांनी गीतलेखन, आकाश रिजिआ यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. या गाण्याचं म्युझिक व्हिडिओचं छायांकन रोहन कंटक, संकलन जान्हवी लाड यांनी केले आहे. व्हिएतनाम येथील नितांतसुंदर डोंगराळ परिसरात हा म्युझिक व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे. त्यामुळे सप्तसूर म्युझिकचा शंभर म्युझिक व्हिडिओच्या निर्मितीची वाटचाल एकूणच संगीत क्षेत्राला, नवोदितांना दिशा देण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे.
GauriShankar: नव्या दमाच्या कलाकारांचा नवा कोरा चित्रपट ‘गौरीशंकर’ चा धडाकेबाज टीजर लाँच!
“कोई आनेवाला है” या म्युझिक व्हिडीओमध्ये मराठी अभिनेत्री विदुला चौगुले देखील दिसत आहे. विदुला चौगुले ही मराठी मालिकेतील अत्यंत आघाडीची अभिनेत्री आहे. तसेच अभिनेत्रीने अनेक मराठी चित्रपटातही काम केले आहे. तसेच ती आता सप्तसूर म्युझिकचा शंभरावा म्युझिक व्हिडिओ “कोई आनेवाला है” यातही झळकणार आहे. तिला पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.