फोटो सौजन्य - Social Media
बिग बॉस दररोज नव्या गोष्टींना जन्म देत आहेत. नव्या वळणावर रस्ते बदलत आहेत. बिग बॉस मराठी ६ मध्ये सध्या दोन गट जास्त भिडत आहेत. अशावेळी काल पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये विशालने प्रभू आणि दीपालीला नॉमिनेट केले. या दरम्यान प्रभू आणि विशालमध्ये नेहमीप्रमाणे शाब्दिक बाचाबाची झाली. पण नंतर जेव्हा त्याने दीपालीला नॉमिनेट केले तेव्हा विशालने दीपालीला का त्याने ‘विदेशातली रॅन्डम सेल्सगर्लसारखी दिसते’ असा उल्लेख केला या बद्दल सांगितले होते तरी ही ती त्याला नेहमी त्याच मुद्द्यावरून टार्गेट करते, असे विशालचे म्हणणे होते. यानंतर वाद वाढला.
विशालने दिपालीची ती सवय ज्यात मुद्दाम रुचिताच्या वादामध्ये विशालला ओढण्याचा डाव सगळ्यांसमोर मांडला आणि ते सांगतात विशाल स्वतः म्हणाला की “होय, मला रुचिता आवडते.” विशालचे हे बोल ऐकून सगळ्यांच्या भुवया ताठवल्या आणि विशाल म्हणाला की “होय, आमच्यामध्ये १५ ते १६ वर्षांचा फरक नक्कीच असेल पण तो आमचा प्रश्न आहे, ते आम्ही दोघे बघून घेऊ, आम्ही का इतरांना सांगू?” या दरम्यान रुचिता लाजेने लाल झाल्याचे दिसून आली.
दीपालीने रुचिता आणि विशालचे अभिनंदन केले तसेच विशालला काही शाब्दिक चकमकीत फटकारलेसुद्धा! दिपालीचे म्हणणे आहे की “विशाल, हे नातं इथे जपताय, या घराच्या बाहेरही जपाल तर उत्तम!” या शब्दांनी रुचिता रागात रंगल्याचे दिसून आले.
राखी-रुचिता वाद
जेव्हा राखी आणि रुचिता भांडणात एकमेकांसमोर आले त्या प्रत्येकवेळी राखीने रुचिताला डिवचण्यासाठी विशालचे नाव घेतले. एका वादात तर “विशाल, मी तुझ्याशिवाय हा खेळ नाही खेळू शकत. मी तुझ्याशिवाय नल्ली आहे.” असे शब्द मुद्दाम बोलून राखीने रुचिताला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. काटा गँगच्या या वागण्यामुळे विशालने त्यांना “मला रुचिता आवडते” असे स्पष्ट शब्दातच सांगितले आहे.






