Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Thackeray Brothers Alliance |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाच्या मंडपात डोक्याला शॅाट ! प्रियदर्शिनी आणि अभिजीत ‘या’ नव्या जोडीचा ‘लग्नाचा शॉट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस

प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिजीत आमकर या नव्या जोडीचा आगामी चित्रपट ‘लग्नाचा शॉट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये लग्नाच्या वेळी कुटुंबाचा आणि विशेष नवरा- नवरीचा गोंधळ दिसून येणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 24, 2025 | 11:42 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रियदर्शिनी आणि अभिजीत ही नवी जोडी करणार धमाका
  • ‘लग्नाचा शॉट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस
  • ‘लग्नाचा शॉट’ जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?
 

मराठी चित्रपटसृष्टीत चर्चेत असलेल्या ‘लग्नाचा शॉट’ या आगामी चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून याच पोस्टरमधून चित्रपटातील प्रमुख कलाकारही समोर आले आहेत. या चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिजीत आमकर यांच्या प्रमुख भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याआधी केवळ संकल्पना आणि शीर्षकामुळे उत्सुकता निर्माण करणाऱ्या या चित्रपटाने आता पोस्टरद्वारे थेट लक्ष वेधून घेतले आहे.

हिंदुस्थानी भाऊचा जया बच्चनवर संताप, पापाराझींवर दिलेल्या वक्तव्याबद्दल म्हणाला, ‘ त्यांना त्यांची लायकी समजेल…’

या पोस्टरमध्ये पारंपरिक लग्नाच्या वेशभूषेत दिसणारा नायक-नायिका जोडीने उभे असून, दोघांच्याही चेहऱ्यावर गोंधळलेले, प्रश्नार्थक भाव दिसत आहेत. डोक्याला बंदूकसारखी बोटं लावलेली ही देहबोली पाहाता, लग्नाच्या धावपळीत काहीतरी मोठा घोळ होणार असल्याची स्पष्ट झलक पोस्टरमधून दिसून येत आहे. या दोघांच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर खूप आकर्षित आहे.

पोस्टरच्या पार्श्वभूमीत रेल्वे, बस, वळणावळणाचा रस्ता आणि राशीचक्र अशा दृश्यात्मक घटकांचा वापर करण्यात आला आहे. त्यात ‘लग्नाअगोदरही लग्नानंतरही’ असे शब्दही दिसत आहेत. यामुळे प्रवास, वेळेचा गोंधळ, चुकीचे निर्णय आणि नशिबाचे फेरे यांचा कथेशी असलेला संबंध सूचकपणे समोर येतो. संपूर्ण पोस्टर रंगीबेरंगी, उत्साही आणि गंमतीशीर वातावरण निर्माण करत असून, चित्रपटाचा हलकाफुलका आणि मनोरंजक सूर स्पष्ट करतो.

अक्षय खन्नाचा बदलला Attitude! ‘दृश्यम ३’ साठी जास्त फीची मागणी; चित्रपटात दिसणार नवा लूक

या पोस्टरबाबत बोलताना दिग्दर्शक अक्षय गोरे म्हणाले, ” ‘लग्नाचा शॉट’ ही लग्नाच्या गोंधळाकडे मजेशीर नजरेने पाहाणारी गोष्ट आहे. कोणताही गंभीर संदेश देण्याचा अट्टहास न ठेवता, संपूर्ण कुटुंब एकत्र बसून पाहू शकेल असा निव्वळ मनोरंजनाचा अनुभव आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. हलकंफुलकं, स्वच्छ आणि प्रामाणिक मनोरंजन हेच या चित्रपटाचं खरं बलस्थान आहे.”

महापर्व फिल्म्स निर्मित आणि जिजा फिल्म्स यांच्या सहयोगाने साकारलेल्या ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अक्षय गोरे यांनी केले आहे. गीत, संगीताची धुरा प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी सांभाळली आहे. तर अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी, सुरेश मगनलाल प्रजापती या चित्रपटाचे निर्माते आहेत. ६ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जो पाहताना प्रेक्षकांचे नक्की भरभरून मनोरंजन होणार आहे.

Web Title: The marathi movie lagnacha shot will be released on february 6th 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi latest news
  • Marathi News

संबंधित बातम्या

अक्षय खन्नाचा बदलला Attitude! ‘दृश्यम ३’ साठी जास्त फीची मागणी; चित्रपटात दिसणार नवा लूक
1

अक्षय खन्नाचा बदलला Attitude! ‘दृश्यम ३’ साठी जास्त फीची मागणी; चित्रपटात दिसणार नवा लूक

हिंदुस्थानी भाऊचा जया बच्चनवर संताप, पापाराझींवर दिलेल्या वक्तव्याबद्दल म्हणाला, ‘ त्यांना त्यांची लायकी समजेल…’
2

हिंदुस्थानी भाऊचा जया बच्चनवर संताप, पापाराझींवर दिलेल्या वक्तव्याबद्दल म्हणाला, ‘ त्यांना त्यांची लायकी समजेल…’

Anil Kapoor Birthday : राज कपूरच्या गॅरेजमध्ये दिवसरात्र केले काम, तेलुगू चित्रपटातून पदार्पण आणि आता बॉलीवूडचा सुपरस्टार
3

Anil Kapoor Birthday : राज कपूरच्या गॅरेजमध्ये दिवसरात्र केले काम, तेलुगू चित्रपटातून पदार्पण आणि आता बॉलीवूडचा सुपरस्टार

भारती सिंगने दोन दिवसांनी दाखवली काजूची झलक, बाळाला हातात घेऊन कॉमेडियन भावुक; म्हणाली…
4

भारती सिंगने दोन दिवसांनी दाखवली काजूची झलक, बाळाला हातात घेऊन कॉमेडियन भावुक; म्हणाली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.