Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhaava: चित्रपटाला मिळालेला जबरदस्त प्रतिसाद पाहून विकी कौशल पोहचला बाबुलनाथ मंदिरात; चाहत्यांनी केले कौतुक!

'छावा' बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत उंच भरारी घेत आहे. त्याने १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. दरम्यान, आता यशाचा आनंद घेत असलेल्या विकी कौशलने बाबुलनाथ मंदिरात प्रार्थना केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 17, 2025 | 06:38 PM
(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे, जो बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. सोमवारी, अभिनेत्याने आशीर्वाद घेण्यासाठी मुंबईतील बाबुलनाथ मंदिराला भेट दिली. आता त्याचेच व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. त्यांच्या मंदिर भेटीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आणि चाहत्यांचा त्याला प्रतिसाद मिळत आहे.

Chhaava Movie: ‘हमारी सबसे बडी कमाई…’, थिएटरमधील छोट्या मुलाने दिलेली गर्जना ऐकून विकी भावुक

मंदिरातील विकीचा लूक व्हायरल
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा ऐतिहासिक नाट्यमय चित्रपट २०२५ मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा हिंदी ओपनर बनला आहे आणि विकीचा एकल अभिनेता म्हणून आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे. ‘छावा’ने आता १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात प्रार्थना करताना विकी कौशलने आपला देसी अवतार दाखवला आणि पांढऱ्या पायजम्यासह बेज रंगाचा कुर्ता, कोल्हापुरी चप्पल आणि गडद रंगाचे सनग्लासेस घातले आहे.

चाहत्यांना अभिवादन केले
कडक पोलिस बंदोबस्तात मंदिरात जाताना, त्याने आपल्या चाहत्यांचे स्मितहास्य करून आणि हात जोडून स्वागत केले. वाटेत त्याने काही चाहत्यांसोबत फोटोही काढले. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, विकी मंदिरात प्रार्थना करताना दिसत आहे. विकी, रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना आणि इतर अभिनीत ‘छावा’ने पहिल्या दिवशी ३३ कोटी रुपये कमावले आणि २०२५ मधील सर्वात मोठा हिंदी ओपनर चित्रपट ठरला आहे.

Crazxy: मुलीला वाचवण्यासाठी चक्रव्यूहात अडकला अभिमन्यू, ‘तुंबाड’ फेम सोहम शाहच्या ‘क्रेझी’चा ट्रेलर रिलीज!

चित्रपटाची एकूण कमाई
विकीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग आहे. धमाकेदार सुरुवातीनंतर, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात मोठी उडी घेतली आणि केवळ रविवारीच ५० कोटी रुपयांची कमाई केली. या ऐतिहासिक अ‍ॅक्शन चित्रपटाने पहिल्या रविवारी ४९.६३ कोटी रुपये कमावले, ज्यामुळे पहिल्या तीन दिवसांत त्याचा एकूण गल्ला ११७.६३ कोटी रुपये झाला आहे. चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Vicky kaushal visits babulnath temple in mumbai took blessing offers prayers for chhaava box office success

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2025 | 06:38 PM

Topics:  

  • chhava
  • entertainment
  • Vicky Kaushal

संबंधित बातम्या

आयुष्मानची टक्कर होणार एका भयानक राजाशी; ‘Thama’ मधील संपूर्ण स्टारकास्टचा लूक रिलीज
1

आयुष्मानची टक्कर होणार एका भयानक राजाशी; ‘Thama’ मधील संपूर्ण स्टारकास्टचा लूक रिलीज

हरनाज संधू आणि टायगरच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन, ‘Baaghi 4’ मधील पहिलं गाणं रिलीज!
2

हरनाज संधू आणि टायगरच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन, ‘Baaghi 4’ मधील पहिलं गाणं रिलीज!

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष
3

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष

अली फजलच्या ‘Raakh’ वेब सिरीजची घोषणा; पोस्टर पाहून चाहते म्हणाले, ‘गुड्डू भैयाचा लूक जबरदस्त’
4

अली फजलच्या ‘Raakh’ वेब सिरीजची घोषणा; पोस्टर पाहून चाहते म्हणाले, ‘गुड्डू भैयाचा लूक जबरदस्त’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.