(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
‘क्रेझी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट ग्रीश कोहली यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात सोहम शाह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोहम शाह यापूर्वी ‘तुंबाड’, ‘दाहद’ आणि ‘महाराणी’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे. हा चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये त्यांचे अनोखे काम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
ट्रेलरमध्ये काय आहे खास?
चित्रपटाचा ट्रेलर खूपच दमदार आहे. यामध्ये सोहम शाह त्याच्या मुलीचा शोध घेताना दिसत आहे. चित्रपटात, नायकाच्या मुलीचे अपहरण होते. नायक त्याच्या मुलीला सोडवण्यासाठी ५ कोटी रुपयांची व्यवस्था करतो. नायक अपहरणकर्ता जे म्हणतो तेच करतो. हा चित्रपट याचभोवती फिरतो. या ट्रेलरवरून चित्रपट वडील आणि मुलीच्या नात्यावरील संबंधात आहे असं दिसून येत आहे.
ट्रेलरमधील संवाद खूपच छान आहेत
चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी त्याचे अनेक पोस्टर्स प्रदर्शित झाले आहेत. त्यात अनेक उत्कृष्ट संवाद लिहिले गेले आहेत. एका पोस्टरमध्ये लिहिले आहे, ‘अभिमन्यू, तू चक्रव्यूहात अडकला आहेस.’ दुसऱ्या पोस्टरमध्ये लिहिले आहे, ‘जर त्याने शत्रूचे ऐकले तर तो मरेल!’. चित्रपटामधील कथा, स्टारकास्ट आणि संवाद खूपच तगडा आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजनंतर आता प्रेक्षकांमध्ये चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
गुलजार यांनी लिहिलेली गाणी
‘क्रेझी’ चित्रपटाचे लेखक गिरीश कोहली यांनी केले आहे. याचे निर्माते सोहम शाह, मुकेश शाह, अमिता सुरेश शाह आणि आदेश प्रसाद आहेत. चित्रपटातील गाणी गुलजार यांनी लिहिली आहेत. संगीत विशाल भारद्वाज यांनी दिले आहे. हा चित्रपट पाहताना नक्कीच प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन होणार आहे.
सोहम शाहने प्रेक्षकांना दिले एक वचन
अलीकडेच सोहम शाह फिल्म्स नावाच्या इंस्टाग्राम पेजवर एक स्टोरी पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये सोहम शाहला असे म्हणताना ऐकू येते की, ‘तुम्ही चित्रपट पाहताना एकदा नक्कीच म्हणाल की आम्ही काहीतरी नवीन लिहिले आहे.’ मला त्या कॉमिक्सचे खूप वेड आहे. चित्रपट पाहून बाहेर पडल्यावर तुम्हाला वाटेल की तुम्ही काहीतरी नवीन पाहिले आहे. हे माझे ठाम वचन आहे.’ असे अभिनेता म्हणाला आहे.